पान 4- गिरी येथील अपघातप्रकरणी एकास कारावास
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:34+5:302015-08-26T23:32:34+5:30
म्हापसा : गिरी येथील झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शौनक पै याला न्यायालयाने विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा फर्मावली आहे. या प्रकरणात बार्देस तालुक्यातील प्रथम वर्ग न्यायालयाने शौनकला दोषी ठरवून 1 वर्षाचा कारावास व 8500 रुपये दंड दिला आहे. दिलेला दंड न भरल्यास वेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पान 4- गिरी येथील अपघातप्रकरणी एकास कारावास
म हापसा : गिरी येथील झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शौनक पै याला न्यायालयाने विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा फर्मावली आहे. या प्रकरणात बार्देस तालुक्यातील प्रथम वर्ग न्यायालयाने शौनकला दोषी ठरवून 1 वर्षाचा कारावास व 8500 रुपये दंड दिला आहे. दिलेला दंड न भरल्यास वेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, ही घटना दि. 1 जानेवारी 2011 रोजी घडली होती. रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या वाहनावर शौनक पै याने धडक दिली होती. यामध्ये पार्क केलेल्या वाहनावर बसलेल्या कीर्ती चोडणकर या मुलीला मरण आले होते. तिच्यासोबत दोघे पुढे बसलेले किरकोळ जखमी झाले होते. शौनक हा दारूच्या नशेत वाहन चालवत होता. या वाहनाला धडक दिल्यानंतर त्याने समोर असलेल्या ट्रकलाही धडक दिली होती. या प्रकरणी सरकारी वकील नीता मराठे यांनी न्यायालयात सरकारी बाजू मांडली. (खास प्रतिनिधी)