पान ४ - दवर्ली खूनी हल्ला प्रकरणात एकाची
By admin | Updated: July 9, 2015 23:21 IST
दवर्ली खुनी हल्ला प्रकरणात एकाची साक्ष नोंद
पान ४ - दवर्ली खूनी हल्ला प्रकरणात एकाची
दवर्ली खुनी हल्ला प्रकरणात एकाची साक्ष नोंदमडगाव : दवर्ली येथील खुनी हल्ला प्रकरणात गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.व्ही. सावईकर यांनी पंच साक्षीदार रेहमत मुल्ला याची साक्ष नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या साक्षीदाराची सरतपासणी घेतली.१६ फेब्रुवारी २0१३ रोजी गुन्हा घडलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला होता. दवर्ली येथील मेहबूबखान पठाण याच्या किराणामाल दुकानाची तोडफोड केली होती. सर्वत्र काचेचे तुकडे विखुरलेले होते. घटनास्थळाहून रक्तमिश्रित माती व लोखंडी सळी जप्त करण्यात आली होती, असे न्यायालयात सांगताना या मुल्ला यांनी या वस्तूंची न्यायालयात ओळख पटविली.का-दवर्ली येथील मेहबूबखान पठाण याच्या दुकानाजवळ हल्ला झाला होता. नेरुल येथील मेहबूब शेख व मोहमद जिया उल्ला, पेडामळ-शिरवई येथील इब्राहिम सज्जू, चिंबल येथील इम्तियाज रेहमान व बेती-वेरे येथील अब्बु शेख यांनी अल्ताफ नंदेहळ्ळी व मेहबूबखान यांच्यावर लोखंडी सळ्यांनी प्राणघातक हल्ला चढविला होता. (प्रतिनिधी)