पान 4- अपघातात वृद्धा ठार
By Admin | Updated: July 31, 2015 23:02 IST2015-07-31T23:02:35+5:302015-07-31T23:02:35+5:30
लातूर-महाराष्ट्रातील कुटुंबीयांवर काळाचा घाला; सात जण जखमी

पान 4- अपघातात वृद्धा ठार
ल तूर-महाराष्ट्रातील कुटुंबीयांवर काळाचा घाला; सात जण जखमीकाणकोण : माड्डीतळप-लोलये येथे शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास इनोवा कार व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात वृध्द महिला ठार झाली. तर चालकासह सातजण जखमी झाले. जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार चालू आहेत. काणकोण पोलिसांच्या माहितीनुसार, लातूर-महाराष्ट्र येथून गोव्यात आलेल्या व पणजीहून गोकर्णला निघालेल्या शिंदे कुटुंबीयांच्या कारचा माड्डीतळप-लोलये यथे अपघात झाला. यामध्ये त्रिवेणी शिंदे (80) या वृध्दा ठार झाल्या. तर बाजीराव शिंदे (47), सुनीता शिंदे (45), कल्याणी शिंदे (23), सयाजी शिंदे (15), कोमल देशमुख (60) व ऐश्वर्या शिंदे (19), चालक तनय मसूरकर (27) हे जखम झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिंदे कुटुंबीयांची गाडी पोळे-दापट येथे पोहोचताच रस्त्यावर गुरे धावत आल्याने चालकाने गुरांना चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरुध्द दिशेने कर्नाटकातून येणारा मालवाहू ट्रक समोर आला. तेव्हा ट्रकला चुकविण्याचा प्रयत्न करत असताना इनोवा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक दिली. त्यात त्रिवेणी शिंदे गाडीतून बाहेर फेकल्या गेल्या. त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने काणकोण इस्पितळात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस उपनिरीक्षक एडवीन फर्नांडिस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)ढँ3 : 3107-टअफ-15कॅप्शन: पोळे-दापट येथे विजेच्या खांबाला धडक दिलेली इनोवा कार. (छाया: संजय कोमरपंत)