पान 4- मणिपुरी गँगमधील दोघांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:25+5:302015-08-16T23:44:25+5:30
मडगाव : मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या रुफीयत अली व अब्दुल्ला अब्दुल कलाम या मणिपुरी गँगमधील दोघा जणांना अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. दि. 14 ऑगस्ट रोजी पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे एक लाखाचा ऐवज जप्त केला होता. गोव्यात दरोडा घालण्यासाठी ही गँग आली होती. या दोन संशयितांचे अन्य तीन साथीदार अजून फरार असून, त्यांचा शोध चालू आहे. संशयितांकडून पोलिसांनी एक जिवंत काडतूसही जप्त केले होते. भादंसंच्या 399 (दरोड्याची तयारी करणे) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या 3 व 25 कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

पान 4- मणिपुरी गँगमधील दोघांना पोलीस कोठडी
म गाव : मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या रुफीयत अली व अब्दुल्ला अब्दुल कलाम या मणिपुरी गँगमधील दोघा जणांना अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. दि. 14 ऑगस्ट रोजी पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे एक लाखाचा ऐवज जप्त केला होता. गोव्यात दरोडा घालण्यासाठी ही गँग आली होती. या दोन संशयितांचे अन्य तीन साथीदार अजून फरार असून, त्यांचा शोध चालू आहे. संशयितांकडून पोलिसांनी एक जिवंत काडतूसही जप्त केले होते. भादंसंच्या 399 (दरोड्याची तयारी करणे) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या 3 व 25 कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.(प्रतिनिधी)