पान 4- बॅँक ऑफ इंडिया चोरीप्रकरणी तपास शून्य
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:10+5:302015-07-31T23:03:10+5:30
म्हापसा : येथील बॅँक ऑफ इंडियाच्या शाखेत 22 जुलै रोजी झालेल्या चोरी प्रकरणाची 10 दिवसांनंतर तपासात कोणत्याच प्रकारची प्रगती नसल्याचे दिसून आले आहे.

पान 4- बॅँक ऑफ इंडिया चोरीप्रकरणी तपास शून्य
म हापसा : येथील बॅँक ऑफ इंडियाच्या शाखेत 22 जुलै रोजी झालेल्या चोरी प्रकरणाची 10 दिवसांनंतर तपासात कोणत्याच प्रकारची प्रगती नसल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांनी कॅशियरच्या चेंबरमधून त्याच्या नकळत 12 लाख 10 हजार रुपये असलेली पैशांची बॅग दिवसाढवळ्या लांबवली होती. या घटनेनंतर कर्नाटक येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तामिळनाडूतील मधुसूदन एम या चोरट्याला काणकोण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी मधुसूदन याने दिलेल्या माहितीच्या आधारावर एक पथक मागील आठवड्यात तामिळनाडू येथे बाकी संशयितांचा शोध घेण्यासाठी गेले होते; परंतु पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने पथक खाली हात राज्यात परतले. म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर यांना विचारले असता, तपासकामात कोणत्याच प्रकारची प्रगती नाही. तामिळनाडूत गेलेले पथक परत आले असून चोरलेली रक्कम अजूनपर्यंत ताब्यात मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित पथक तामिळनाडूला शोध कार्यासाठी गेले होते. मात्र, पथकाला आरोपीचे घर बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरटे सापडू शकले नाहीत; पण अटक केलेल्या चोरट्याने त्याच्या इतर साथीदारांची विस्तारित माहिती, नावे पोलिसांना दिली आहेत. त्याआधारे तपासकाम सुरू असल्याची माहिती वेर्णेकर यांनी दिली. (खास प्रतिनिधी)