पान 4 : ट्रकचालकांना आर्थिक पॅकेज द्या
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30
शिवसेनेची मागणी : कुडचडे, सावर्डे, सांगे, केपेतून रॅली

पान 4 : ट्रकचालकांना आर्थिक पॅकेज द्या
श वसेनेची मागणी : कुडचडे, सावर्डे, सांगे, केपेतून रॅली कुडचडे : गोवा राज्य शिवसेनेतर्फे सावर्डे, सांगे, केपे या मार्गावरून खनिज ट्रकचालकांना प्रत्येकी पाच लाखांचे नुकसान भरपाई पॅकेज द्यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळी 10 वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीत दोनशेहून अधिक ट्रकचालक सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात सावर्डे येथील मुख्य चौकातील पेट्रोल पंपपासून करण्यात आली. रॅलीचा शेवट सावर्डेमध्येच करण्यात आला. या वेळी शिवसेना उपराज्यप्रमुख सुदेश भिसे म्हणाले की, ट्रकचालकांची तीन वर्षांपासून उपासमार सुरू आह़े त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आह़े याप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली काढावी लागली. आता बुधवार, दि़ 9 रोजी पणजीत परेड ग्राउंड ते आझाद मैदान या मार्गावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही भिसे म्हणाले. या वेळी पाच ते सहा हजारांच्या संख्येने ट्रकचालक उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या वेळी ऑल गोवा ट्रकचालक युनियनचे विष्णू सावळ म्हणाले की, तीन वर्षांपासून खाण उद्योग बंद आह़े मात्र, सरकारने आमच्यासाठी काहीच केलेले नाही. साखळीचे विद्यमान आमदार डॉ. प्रमोद सावंत यांना पूर्वी याबाबत निवेदन सादर केले होते. त्यांनी याबाबत आश्वासन दिले होते; परंतु त्यानंतर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही़ सरकारने अनेकांना पॅकेज दिल़े त्याप्रमाणे आम्हालाही मिळणे गरजेचे आहे. या वेळी दक्षिण गोवा जिल्?ाचे पदाधिकारी बाबूराव नाईक, केपे तालुका प्रमुख संदीप शिरवईकर, ट्रकचालक सुरेंद्र देसाई, दीपक गावकर, सुधाकर गावकर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)ढँ3 : 0709-टअफ-05कॅप्शन: रॅलीमध्ये सहभागी झालेले शिवसेना गोवा उपराज्यप्रमुख सुदेश भिसे, बाबूराव नाईक व इतर. (छाया:साईप्रसाद साळोके)