पान 4- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी युवकाला पाच दिवसांची कोठडी
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:47+5:302015-08-08T00:23:47+5:30
बार्देस : दहावीत शिकणार्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रोहित गावडे (23, रा. गोठणीचा व्हाळ-कोलवाळ, मूळ आंबोली) या युवकाला गुरुवारी (दि. 6) रात्री उशिरा अटक केली होती. त्याला शक्रवारी (दि. 7) न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गोवा चाईल्ड लाईनच्या समन्वयक साझना डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली होती. बलात्कार करण्यात आलेली युवती चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी डिसोझा या शाळेत समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. दि. 30 जून रोजी डिसोझा या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी समुपदेशन करीत असताना पीडित युवतीने आपल्या पोटात दुखत असून एका महिन्यानंतर

पान 4- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी युवकाला पाच दिवसांची कोठडी
ब र्देस : दहावीत शिकणार्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रोहित गावडे (23, रा. गोठणीचा व्हाळ-कोलवाळ, मूळ आंबोली) या युवकाला गुरुवारी (दि. 6) रात्री उशिरा अटक केली होती. त्याला शक्रवारी (दि. 7) न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गोवा चाईल्ड लाईनच्या समन्वयक साझना डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली होती. बलात्कार करण्यात आलेली युवती चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी डिसोझा या शाळेत समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. दि. 30 जून रोजी डिसोझा या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी समुपदेशन करीत असताना पीडित युवतीने आपल्या पोटात दुखत असून एका महिन्यानंतर म्हापसा जिल्हा इस्पितळात सोनोग्राफीची तारीख असल्याचे डिसोझा यांना सांगितले. या माहितीच्या आधारे डिसोझा यांनी सोनोग्राफीसाठी एवढा उशीर नको, असे सांगून जिल्हा इस्पितळातून सोनोग्राफीची तारीख दि. 6 रोजी निश्चित करून घेतली. जिल्हा इस्पितळात युवतीची सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा तिला दिवस गेले असून ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या अहवालातून स्पष्ट झाले. दरम्यान, डॉक्टरांचा अहवाल मिळताच डिसोझा यांनी पीडित मुलीशी संवाद साधला व तिच्यावर हा प्रसंग कसा ओढवला याची विचारपूस केली.तेव्हा संशयित रोहितने कारमध्ये नेऊन आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. या माहितीच्या आधारे डिसोझा यांनी संशयिताविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयितास गोठणीचा व्हाळ येथून ताब्यात घेऊन अटक केली. पीडित युवती व संशयित एकमेकांना ओळखतात. संशयित करासवाडा येथील कंपनीत चालक म्हणून नोकरीला आहे. संशयिताने बलात्कारासाठी वापरलेली एमएच 31 पीएम 6187 क्रमांकाची कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कार संशयिताने एकट्याकडून विकत घेतली होती. त्यानंतर त्याने कार दुसर्याला विकली. (प्रतिनिधी)