पान ४- साळगावकर कंपनीच्या वर्कशॉपला आग
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
लाखोंचे साहित्य खाक : वागुस, कोठंबीतील प्रकार

पान ४- साळगावकर कंपनीच्या वर्कशॉपला आग
ल खोंचे साहित्य खाक : वागुस, कोठंबीतील प्रकारडिचोली : वागुस, कोठंबी, पाळी पंचायत क्षेत्रात सुक्या गवताला आग लागल्याने साळगावकर कंपनीच्या जागेतील वर्कशॉपला घेरले. यात कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळाले. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. डिचोली, वाळपई, फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कंपनीची मालमत्ता वाचविली, अशी माहिती डिचोली दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.सुक्या गवताला लागलेल्या आगीने दुपारी साडेतीनच्या सुमारास रौद्ररूप धारण करत साळगावकर कंपनीच्या जागेत प्रवेश केला. या जागेतील काही प्रमाणात स्क्रॅप साहित्य, कनवेयर बेल्ट, उभे असलेले ट्रकांचे टायर्स आगीच्या भक्षस्थानी पडले. डिचोली अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच जवानांनी आग आटोक्यात आणली. डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसानीचा नेमका आकडा सांगता येणार नाही. (प्रतिनिधी)फोटो ओळी- आगीत जळालेले कनवेयर बेल्ट व ट्रकांचे टायर्स. (छाया : विशांत वझे)