पान ३ : युवकांनी कौशल्य आत्मसात करावे : ढवळीकर

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:26+5:302015-07-16T15:56:26+5:30

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मडगावात रॅली

Page 3: Youth should absorb skill: Dhavalikar | पान ३ : युवकांनी कौशल्य आत्मसात करावे : ढवळीकर

पान ३ : युवकांनी कौशल्य आत्मसात करावे : ढवळीकर

गतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मडगावात रॅली
मडगाव : जागतिक युवा कौशल्यदिनानिमित्त बुधवारी मडगावात युवकांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला कारागीर प्रशिक्षण खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी हिरवा बावटा दाखवून सुरुवात केली. युवकांचे कौशल्य विकसित होण्यासाठी सरकारने वेगवेगळे अभ्यासक्रम आणले आहेत. या अभ्यासक्रमाचा युवकांनी फायदा घेऊन आपले कौशल्य विकसित करावे, असे ते म्हणाले.
या वेळी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी सचिन शिंदे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक शिरीष लवंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या मिरवणुकीत नेहरू युवा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू झालेली ही मिरवणूक मडगाव नगरपालिकेजवळ येऊन विसर्जित करण्यात आली. (प्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 1507-टअफ-26
कॅप्शन: मिरवणुकीला सुरुवात करून देताना मंत्री दीपक ढवळीकर. सोबत आमदार विजय सरदेसाई व इतर. (छाया: पिनाक कल्लोळी)

Web Title: Page 3: Youth should absorb skill: Dhavalikar