पान ३- पर्यटनासाठी आग्वादचा वापर

By Admin | Updated: July 15, 2015 00:14 IST2015-07-15T00:14:59+5:302015-07-15T00:14:59+5:30

पर्यटनासाठी आग्वाद किल्ल्याचा वापर

Page 3 - Use of fire for tourism | पान ३- पर्यटनासाठी आग्वादचा वापर

पान ३- पर्यटनासाठी आग्वादचा वापर

्यटनासाठी आग्वाद किल्ल्याचा वापर
पणजी : आग्वाद तुरुंग तथा किल्ला आता रिकामा झाला आहे. तिथून कैदी कोलवाळ येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्या किल्ल्याचा वापर पर्यटनासाठी करण्याच्यादृष्टीने आपण प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. सरकार प्रस्तावाची पडताळणी करून पाहील. खरोखर त्या किल्ल्याचा वापर नूतनीकरणानंतर पर्यटन व्यवसायाशी निगडित उपक्रमांसाठी करता येईल का, यासंबंधी विचारविनिमय सुरू असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. दरम्यान, मांडवी नदीत असलेली कॅसिनो जहाजे आग्वाद किंवा साळ किंवा जुवारी नदीत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. अजून निर्णय झालेला नाही. त्याविषयी विधानसभा अधिवेशनानंतर एक बैठक घेतली जाईल, असे परुळेकर यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Page 3 - Use of fire for tourism