पान 3 : चित्रप्रदर्शनात संजय नाईक यांच्या कलाकृती

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30

हरमल : कला संस्कृती खात्यातर्फे पाटो येथील संस्कृती भवनातील कला गॅलरीत ‘गणेशा’ हे चित्रप्रदर्शन भरवले असून यात प्रज्ञा हायस्कूलचे शिक्षक संजय नाईक यांनी आपली चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. हे चित्रप्रदर्शन 9 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे.

Page 3: Sanjay Naik's artwork in portrait presentation | पान 3 : चित्रप्रदर्शनात संजय नाईक यांच्या कलाकृती

पान 3 : चित्रप्रदर्शनात संजय नाईक यांच्या कलाकृती

मल : कला संस्कृती खात्यातर्फे पाटो येथील संस्कृती भवनातील कला गॅलरीत ‘गणेशा’ हे चित्रप्रदर्शन भरवले असून यात प्रज्ञा हायस्कूलचे शिक्षक संजय नाईक यांनी आपली चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. हे चित्रप्रदर्शन 9 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे.
गणेशचतुर्थी सणाचे औचित्य साधून ‘गणेशा’ या संकल्पनेतून गोमंतकीय युवा कलाकारांच्या प्रतिभेस वाव देण्यात आला. हरमल येथील संजय नाईक यांच्या कलाकृती वेधक आहेत. आकर्षक रंगसंगत निवड व तन्मयतेने रेखाटलेले हुबेहूब चित्र त्याचे वैशिष्ट्य आहे. पेंटिंग्जबरोबर थर्माकोलपासून मखरे व अन्य वस्तूंद्वारे संजय नाईक नेहमीच व्यस्त असतात. नुकतीच प्रज्ञा हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षक वर्गाने खास उपस्थिती लावून कलेस दाद दिली. (प्रतिनिधी)
फोटो :(0709-एमएपी-02)
संस्कृती भवनातील आर्ट गॅलरीत कलाकृतीसह कला शिक्षक संजय नाईक.

Web Title: Page 3: Sanjay Naik's artwork in portrait presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.