पान 3 : राष्ट्रसेवा दलानेच माझ्यातील कवीला स्फूर्ती दिली
By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:27+5:302015-08-03T22:31:27+5:30
गजानन रायकर : विद्या निकेतनच्या आस्वाद कार्यक्रमात मुलाखत रंगली

पान 3 : राष्ट्रसेवा दलानेच माझ्यातील कवीला स्फूर्ती दिली
ग ानन रायकर : विद्या निकेतनच्या आस्वाद कार्यक्रमात मुलाखत रंगलीमडगाव : गोवा मुक्ती लढय़ात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यामुळे अण्णा देशपांडे, पिटर आल्वारिस, एस. एम. जोशी. नाथ पै., ना. ग. गोरे या दिग्गज नेत्यांचा सहवास लाभला. याचवेळी राष्ट्रसेवा दलाचे संस्कार माझ्यावर झाले आणि त्यातूनच कवितेचे बिज माझ्यात अंकुरले गेले, असे शब्द प्रसिद्ध कवी व स्वातंत्र्यसैनिक गजानन रायकर यांनी काढले. गोमंत विद्या निकेतन संस्थेने आयोजित केलेल्या आस्वाद या कार्यक्रमात त्यांनी आपले बालपण नंतरचा स्वातंत्र्य संग्रामाचा काळ, राजकीय प्रवास आदींचा पट उलगडून दाखविला.र्शीकृष्ण अडसूळ व मेघना कुरुंदवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत रायकर म्हणाले, राष्ट्रसेवा दलात असताना अमर शेख, दादा कोंडके, वसंत बापट, लिलाधर हेगडे यांच्या कला पथकांतून काम करताना मलाही स्फूर्तीगीत लिहिण्याचा आणि ती आवेशात सादर करण्याचा छंद जडला आणि त्यातूनच माझीही समरगीते बाहेर आली, असे ते म्हणाले. मुंबईत असताना परळ येथील कामगार मैदान हीच माझी कार्यशाळा होती. याच मैदानावर र्शीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, मधू लिमये यांच्या सभांनी माझ्यावर गारुड केले होते, असे ते म्हणाले.अत्यंत गरिबीतून वर आलेले रायकर यांनी गुराख्यापासून घरगड्यापर्यंत हरएक काम केले. मुंबईत घरगडी म्हणून वावरतानाच मी सातवी परीक्षा पास झालो आणि गोव्यात परतलो. त्या वेळी गोव्यात गावडा-कुळवाडी म्हणून माझी हेटाळणी झाली; पण हिंमत न हारता मी वाटचाल केली. ज्या गोव्याने माझी हेटाळणी केली त्याच गोव्याने नंतर मला डोक्यावर घेतले, असे ते म्हणाले.अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन कविता बोरकर यांनी तर उपाध्यक्ष सुहास नायक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल एक मिनिट मौन पाळून त्यांच्या स्मृतींना र्शध्दांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)ढँ3 : 0308-टअफ-10 गजानन रायकर यांची मुलाखत घेताना र्शीकृष्ण अडसूळ व मेघना कुरुंदवाडकर.