पान ३ मोपा जनसुनावणीची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
हणखणे : मोपा येथे होऊ घातलेल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ जनसुनावणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पान ३ मोपा जनसुनावणीची तयारी अंतिम टप्प्यात
ह खणे : मोपा येथे होऊ घातलेल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ जनसुनावणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येथील पठारावर प्रशस्त मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. रविवार, दि. १ रोजी होणार्या या जनसुनावणीला राज्यभरातून चार-पाच हजार लोक उपस्थिती लाभणार हे लक्षात घेऊन गोव्याबाहेरील कंपनीला हे काम देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. त्या जागेची उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी पाहणी केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. शम्याचे आडवण येथील मुख्य रस्त्यापासून जनसुनावणी होणार्या ठिकाणापर्यंत रस्ता बनविण्यात आला आहे. त्या दिवसापासून पेडणे पोलीस तसेच गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करीत आहेत. मोपा विमानतळ विरोधक या ठिकाणी गांेधळ घालू शकतील, हे लक्षात घेऊन पोलिसांनी त्यासाठी सतर्कता बाळगली आहे.जनसुनावणीसाठी प्रशस्त मंडप उभारण्याचे काम कोल्हापूर येथील गजानन काटे या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. माहितीनुसार पूर्व दिशेला मोठे व्यासपीठ उभारण्यात येत आहे. व्यासपीठासमोर शासकीय वरिष्ठ अधिकार्यांची बैठक व्यवस्था, त्यांच्या मागे पत्रकार कक्ष, त्यानंतर १० ते १५ मीटर मोकळी जागा ठेवून त्यानंतर जनसमुदायाला बसण्याची सोय करण्यात येणार आहे.व्यासपीठाच्या पूर्व आणि उत्तर दिशेच्या (मंडपाबाहेर) कोपर्यात शासकीय अधिकार्यांच्या गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था, तर मंडपाच्या अलिकडे शम्याचे आडवण दिशेकडे येणार्या लोकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोक बसणार त्या पाठीमागे एका बाजूला पुरूषांसाठी, तर दुसर्या बाजूला महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय करण्यात आली आहे. पेडणे तालुक्यातील सुकेकुळणपासून नागझर ते मोपा पठारापर्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय सर्वत्र साध्या वेषातील पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. वीजप्रवाहाची सोय नसल्याने या ठिकाणी जनरेटरची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, पेडणेचे पोलीस निरिक्षक तुषार लोटलीकर यांच्यावर मोठी जबाबदारी असून, ते स्वत: याबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना करीत आहेत. (प्रतिनिधी) फोटो : मोपा पठारावर जनसुनावणीसाठी उभारण्यात येणार्या मंडपाचे काम जोरात चालू आहे. (महादेव च्यारी) ३००१-एमएपी-०१