पान 3 : गोव्यातील स्मार्ट सिटीबाबत निर्णय नाही : राज्यसभेत मंत्र्यांची माहिती

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30

पणजी : गोव्यातील कोणतेही शहर स्मार्ट सिटी बनविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात दिली आहे.

Page 3: No decision on Goa's smart city: Minister's information in Rajya Sabha | पान 3 : गोव्यातील स्मार्ट सिटीबाबत निर्णय नाही : राज्यसभेत मंत्र्यांची माहिती

पान 3 : गोव्यातील स्मार्ट सिटीबाबत निर्णय नाही : राज्यसभेत मंत्र्यांची माहिती

जी : गोव्यातील कोणतेही शहर स्मार्ट सिटी बनविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात दिली आहे.
देशातील 100 शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याची योजना 25 जून रोजी सुरू झाली. स्पर्धेतून शहरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही घालून देण्यात आलेली असून निवडीसाठी शहरांमध्ये स्पर्धेचे आव्हान असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांच्या तसेच स्पर्धेच्या कसोटीला गोव्यातील शहरांनाही खरे उतरावे लागेल. पहिल्या टप्प्यात ही स्पर्धा झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात शहराचा आराखडा तयार करून केंद्राला पाठवावा लागेल, असे उत्तरात म्हटले आहे.
पणजी शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाल्याचे राज्य सरकार सांगत आहे, ती चुकीची माहिती असल्याचा दावा शांताराम यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
चौकट
दरम्यान, शांताराम यांच्या अन्य एका प्रश्नावर लेखी उत्तरात केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धन राठोड यांनी अशी माहिती दिली आहे की, ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी दोन वर्षांकरिता 8 कोटी 54 लाख 74 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Page 3: No decision on Goa's smart city: Minister's information in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.