पान 3 : नेरूल जमीन वाद प्रकरण (((शंका)))

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

जमीन वाद प्रकरणी दोघांनाच पक्षकार

Page 3: Nerul land dispute case (((doubt)) | पान 3 : नेरूल जमीन वाद प्रकरण (((शंका)))

पान 3 : नेरूल जमीन वाद प्रकरण (((शंका)))

ीन वाद प्रकरणी दोघांनाच पक्षकार
करून घेतल्याने नेरुलवासीय नाराज
सुनावणी पुढे ढकलली : सर्व ग्रामस्थांना पक्षकार करून घेण्याची मागणी
म्हापसा : नेरूल येथील जमीन वाद प्रकरणात फक्त दोनच पक्षकारांविरुद्ध गुन्हेगारी संहितेखाली गुन्हा दाखल केल्याने नेरूलवासियांनी याला आक्षेप घेतला. या प्रकरणी सोमवारी बार्देस उपजिल्हाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवली आहे. सुनावणीवेळी नेरूलवासियांना पक्षकार करण्याची मागणी नेरूलवासियांच्या वतीने केली.
मागील सुनावणी 26 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. त्या दिवशी उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर अनुपस्थित राहिल्याने सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे सुनावणी स्थगित ठेवून 7 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. नेरूल येथे सव्र्हे क्र. 15/1 व 91/1 या जमिनीच्या मालकीवरून डॉन बॉस्को संस्था व नेरूल ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे. तेथील र्शी कालिका देवीची घुमटी मोडून मूर्ती पळविल्याने व स्मशानभूमीकडे जाणारी वाट अडविल्याने नेरूल गावातील वातावरण बरेच तंग होते. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी दोन्ही पक्षकारंविरुद्ध गुन्हेगारी संहितेच्या 145 (1) कलमखाली येथील उपजिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तसेच याप्रकरणी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी नेरूल ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नेरूलच्या पंच शशिकला गोवेकर व विनायक मयेकर या दोघांनाच पक्षकार करण्यात आल्याने लोकांनी पर्वरी पोलिसांवर सुनावणीनंतर आपला संताप व्यक्त केला. (खास प्रतिनिधी)

पर्वरी पोलिसांचा निषेध
या प्रकरणात सगळ्या ग्रामस्थांना पक्षकार केले पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामस्थ शैलेश नागवेकर यांनी आपली नापसंती व्यक्त केली. जिल्हा पंचायत सदस्य रूपेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना आपला आक्षेप नोंदवताना ज्या व्यक्तींनी देवळाची मोडतोड केली, त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली गेली नसल्याने व त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने आपली नापसंती व्यक्त करून पर्वरी पोलिसांचा निषेध केला. ((((काल))))) घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यात महिलांचा समावेश जास्त प्रमाणावर होता.

फोटो :(0709-एमएपी-06)
नेरूल जमीन वाद प्रकरणाच्या सुनावणीवेळी जमा झालेले नेरूलचे ग्रामस्थ.

Web Title: Page 3: Nerul land dispute case (((doubt))

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.