पान 3 : साहित्यिकांनी विषयर्मयादेत अडकू नये
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:32+5:302015-09-07T23:27:32+5:30
राजेंद्र आर्लेकर : शिरोडकर यांच्या ग्रीष्मा कवितासंग्रहाचे प्रकाशन

पान 3 : साहित्यिकांनी विषयर्मयादेत अडकू नये
र जेंद्र आर्लेकर : शिरोडकर यांच्या ग्रीष्मा कवितासंग्रहाचे प्रकाशनमडगाव : साहित्यिकांनी आपले साहित्य विषयर्मयादेत आकुंचित न ठेवता विविध विषयांवर लेखन करावे. गोव्याचा इतिहास, राजकारण आदी विषयांवर आवर्जून लेखन करावे, अशी अपेक्षा सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केली.अनुया शिरोडकर यांच्या ‘ग्रीष्मा’ या कवितासंग्रहाचे आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार धर्मा चोडणकर, र्शीकृष्ण अडसूळ, लीना पेडणेकर, गोकुळदास शिरोडकर तसेच कवयित्री अनुया शिरोडकर व्यासपीठावर उपस्थित होते.साहित्यिकांनी केवळ ‘स्वान्त सुखाय’साठी लेखन करू नये तर आपल्या लेखनाचा समाजालाही फायदा होईल या दृष्टीने विचार करावा, असे आर्लेकर म्हणाले. या वेळी दामू नाईक म्हणाले की, सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आता साहित्यही व्हायरल व्हावे. साहित्य रसिकांनी आस्वादकांचे क्लब स्थापन करून साहित्याचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.या वेळी प्रा. र्शीकृष्ण अडसूळ व लीना पेडणेकर यांनी कवितासंग्रहावर बोलताना, अनुया शिरोडकर यांच्या कवितेतून उत्कंठतेचा ध्यास ध्वनित होतो, असे मत व्यक्त केले. ही कविता अधिक सकस व्हावी, असा सल्लाही दिला. अनुया शिरोडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शर्मिला प्रभू यांनी केले. (प्रतिनिधी)ढँ3 : 0709-टअफ-09 ‘ग्रीष्मा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना सभापती राजेंद्र आर्लेकर. सोबत (डावीकडून) अनुया शिरोडकर, लीना पेडणेकर, दामू नाईक, धर्मा चोडणकर व र्शीकृष्ण अडसूळ. (छाया: अरविंद टेंगसे)