पान 3 : पावसाअभावी भात वाळण्याची भीती
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:40+5:302015-09-07T23:27:40+5:30

पान 3 : पावसाअभावी भात वाळण्याची भीती
>पाणीपुरवठय़ाची गरज : राज्यातील शेतकरी हवालदिलपणजी : यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात भातपिकावर मोठे संकट कोसळले होते. मध्यंतरी पुन्हा पावसाने जोर धरला. रिमझिम सरींनी शेतजमिनीला कोरड पडू दिली नाही. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने पूर्णपणे दडी मारली असून पुढील दोन-चार दिवस हलकासा पाऊस पडला नाही तर भातशेती पूर्णपणे वाळून जाण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात वर्षापेक्षा जास्त प्रमाणात खरीपहंगामात भातपीक काढण्यासाठी शेतकर्यांनी यंदा कंबर कसली होती. कृषी खात्यानेही पावसापूर्वीच बियाणे उपलब्ध करून पहिल्या पावसातच शेतकर्यांनी भातशेतीच्या लागवडीस जोमाने सुरुवात करावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, जूनमध्ये आठवडाभर पाऊस पडल्यानंतर विस्कळित स्वरूपात पडणार्या पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणीच पळवले. भातशेतीचे पीक काढण्यात येणारा बहुतांश भाग डोंगराळ असल्याने पावसाने दडी मारल्यास शेतीचे मोठे नुकसान होते. पुढील दोन-तीन दिवस पावसाच्या हलक्याशा सरीही कोसळल्या नाहीत तर भातशेती करपून जाण्याची शक्यता कृषी खात्याचे संचालक उल्हास काकोडे यांनी वर्तविली. भातशेतीबरोबर भरड भागात काढण्यात येणारे मिरचीचे पीक तसेच इतर पिकांवरही पडत नसलेल्या पावसाचा परिणाम जाणवणार आहे. पाऊस नसल्याने जमीन कोरडी पडण्याची शक्यता असून यामुळे पीक सुकून जाण्याची भीती शेतकर्यांबरोबरच कृषी अधिकार्यांना असल्याचे काकोडे म्हणाले. भातशेती किंवा मिरचीसारखे उत्पादन नष्ट होऊ नये म्हणून अधिकार्यांनी शेतात धाव घेतली असून शेतकर्यांना भेटून आणि आजूबाजूला पाण्याची सोय असल्यास ते पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती आणि मदत सुरू केली आहे, असे काकोडे यांनी सांगितले. (जोड बातमी आहे.