पान 3 : बार्देसमधील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.

Page 3: Farmers in Barbesc Neglected | पान 3 : बार्देसमधील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

पान 3 : बार्देसमधील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.
पेरणी केलेल्या भातातून कणसे यायला सुरुवात झाली नसून चतुर्थीपर्यंत येणारी कणसे यंदा अजूनपर्यंत आली नसल्याची माहिती हळदोणातील एका शेतकर्‍याने दिली. पेरणी केलेल्या पिकातील काही पिके सरासरीवर 80 ते 120 दिवसांत पिकतात; पण काही पिकांना 40 ते 60 दिवसच झाल्याची माहिती कृषी विभागीय कार्यालयातील उपसंचालक अनिल नोरोन्हा यांनी दिली.
कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बार्देस तालुक्यात 5370 हेक्टर जागेत खरीप हंगामात लागवड करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यंदा विभागीय कार्यालयातून शेतकर्‍यांना सुमारे 110 टन विविध जातीचे भात बियाणे लागवडीसाठी देण्यात आले आहे. यात ज्योती, जया, करंगुट, कर्जत व इतर जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे.
या 5370 हेक्टर शेतीतील फक्त 20 टक्के हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करून यंदा लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 60 हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करण्यात आला होता.
पाण्याअभावी भरड शेतीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली असून काही शेतात पंपाच्या साहाय्याने पाणी देण्यात येत आहे. अशा शेतांवर जास्त प्रमाणात परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. भरड शेतीवर लगेचच परिणाम जाणवणार असल्याची माहिती दिली. (खास प्रतिनिधी)

चौकट
मूग पीक घ्या
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कृषी खात्याने शेतकर्‍यांसाठी मागील काही दिवसांत 50 किलो मुगाचे वितरण केले आहे. मुगाचे पीक सरासरी 50 दिवसांत येत असल्याने हे पीक शेतकर्‍यांना घेता येईल, असे नोरोन्हा म्हणाले. ज्या शेतकर्‍यांनी लागवड केली नाही, अशा शेतकर्‍यांनी मूग खात्याकडून नेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Page 3: Farmers in Barbesc Neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.