पान ३ : कुर्टी येथे अभंग गायन स्पर्धा
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
फोंडा : कुर्टी येथील श्री नागेश महारुद्र कला मंडळातर्फे आयोजित अखिल गोमंतक दीनानाथ नारू फडते स्मृती अभंग गायन स्पर्धा बुधवार दि. १८ मार्च रोजी श्री केशवदेव मंदिर, पंडितवाडा, फोंडा येथे घेण्यात येणार आहे.
पान ३ : कुर्टी येथे अभंग गायन स्पर्धा
फोंडा : कुर्टी येथील श्री नागेश महारुद्र कला मंडळातर्फे आयोजित अखिल गोमंतक दीनानाथ नारू फडते स्मृती अभंग गायन स्पर्धा बुधवार दि. १८ मार्च रोजी श्री केशवदेव मंदिर, पंडितवाडा, फोंडा येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भजनी कलाकार धर्मानंद गोलतकर यांच्या हस्ते १८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. विजेत्यांना प्रथम बक्षीस ३ हजार, दुसरे २ हजार, तिसरे १ हजार तसेच रु. ५00 ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. इच्छुकांनी अजित फडते किंवा गीतेश फडते यांच्याशी संपर्क साधावा.(वार्ताहर).