पान 2- कुजबूज (मा. संपादकसाहेब)

By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:33+5:302015-08-22T00:43:33+5:30

केवळ राजकारण?

Page 2 - Wish (ma. Editor sahib) | पान 2- कुजबूज (मा. संपादकसाहेब)

पान 2- कुजबूज (मा. संपादकसाहेब)

वळ राजकारण?
विशेष न्यायालयाने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी सहा वाजता कामत यांच्यासह त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या घरी टाकण्यात आलेले छापे काही भाजपा पदाधिकार्‍यांनाही आवडले नाहीत. या छाप्यांचे ‘टायमिंग’ चुकले, त्यामुळे कामतांना लोकांची सहानुभूती मिळेल व हे प्रकरण राजकीय असल्याचा समज निर्माण होईल असे त्यांना वाटते. अँड. राजीव गोमीस यांची झालेली नियुक्ती, त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रसाद कीर्तनी यांना कळविण्याचीही तसदी न घेणे व कामत यांचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची अँड. गोमीस यांची सूचना, मडगावात अँड. गोमीस यांची ‘पुढारीगिरी’ या सर्व बाबी यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याशिवाय राहील काय?

भाई तेरा चुक्याच!
भाई ऊर्फ पांडुरंग नायक यांनी दिगंबर कामत यांच्या जामिनानंतर पत्रकारांकडे बोलताना जे वक्तव्य केले त्याचे जोरदार पडसाद मठग्रामात उमटले आहेत. ‘बामण भायर आणि किरिस्ताव भितर’ असे ते म्हणाले; परंतु पुढे त्यांनी अशीही पुस्ती जोडली की, ‘असे मला म्हणायचे नाही; परंतु लोक बोलतात.’ भाई नायक यांना 2017 ची विधानसभा निवडणूक भाजपा तिकिटावर लढवायची आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे लुईस बर्जर प्रकरणात कामत यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागताच मडगावात ज्यांना हर्षवायू झाला, त्यात भाई एक आहेत; परंतु बाबू नायक यांना जसे राजकारणातील चाणाक्य म्हणायचे, तेवढे कौशल्य या चिरंजिवांना नाही. त्यामुळे ते काहीबाही बरळले आणि मडगावात त्यांनी रोष ओढवून घेतलाय. भाजपाच्या पारंपरिक मतदारांना दुखवून भाईंनी शेवटी काय साध्य केले?

Web Title: Page 2 - Wish (ma. Editor sahib)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.