पान 2- कासारवर्णेत आज वादाची शक्यता महादेव देवस्थानात धार्मिक विधी कायदा सुव्यवस्था बिघडू नये साठी प्रशासनातर्फे दक्षता
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
पेडणे : सध्या प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या कासारवर्णे येथील र्शी महादेव देवस्थानात सोमवारी सकाळी होणार्या ‘लघुरुद्रा’मुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात आली आहे.

पान 2- कासारवर्णेत आज वादाची शक्यता महादेव देवस्थानात धार्मिक विधी कायदा सुव्यवस्था बिघडू नये साठी प्रशासनातर्फे दक्षता
प डणे : सध्या प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या कासारवर्णे येथील र्शी महादेव देवस्थानात सोमवारी सकाळी होणार्या ‘लघुरुद्रा’मुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात आली आहे.या देवस्थानचे प्रशासक असलेले मामलेदार राजेश आजगावकर यांनी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या देवस्थानची नूतन समिती बरखास्त केल्याने सध्या या ठिकाणच्या महाजनांत तीन गट निर्माण झाले आहेत. पैकी सरकारने बरखास्त केलेल्या समितीऐवजी त्यांच्या विरोधातील महाजन जोडप्याला मामलेदार आजगावकर यांनी या धार्मिक विधीचे यजमानपद दिले आहे. ही गोष्ट पुरोहिताकडून मावळत्या समितीला समजल्यांतर गावातील काही महिलांनी संबंधितांशी संपर्क साधून देवस्थानासंदर्भाचा वाद आणखी चिघळू नये यासाठी प्रशासकांनी वादग्रस्त महाजनाऐवजी त्रयस्थ असलेल्या एखाद्या महाजनाला पूजेचे यजमानपद द्यायला हवे होते, अशी भूमिका मांडली. मात्र, मामलेदारांनी हा अधिकार आपला असल्याचे सांगून आपल्या र्मजीतीलच महाजनांना हा हक्क बहाल केल्याने गावात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच हा विधी सुरळीतपणे पार पाडावा यासाठी सोमवारी (दि.31)पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी ठेवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळी होणार्या या धार्मिक विधीमुळे या देवस्थानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही तटस्थ महाजनांनी मामलेदार राजेश आजगावकर यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही केली आहे. (प्रतिनिधी)