पान २ : साधनसामग्री नसल्याने वीज यंत्रणा कोलमडली

By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:32+5:302015-07-18T01:12:32+5:30

रेजिनाल्डचा आरोप : १५ दिवसांत साहित्य न मिळाल्यास आंदोलन

Page 2: The power system collapses because there is no equipment | पान २ : साधनसामग्री नसल्याने वीज यंत्रणा कोलमडली

पान २ : साधनसामग्री नसल्याने वीज यंत्रणा कोलमडली

जिनाल्डचा आरोप : १५ दिवसांत साहित्य न मिळाल्यास आंदोलन
मडगाव : वीज खात्याने एका बाजूने वीज बिलांत भरमसाट वाढ केली असताना दुसर्‍या बाजूने खात्याकडे आवश्यक साधनसामग्रीच उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडली आहे. ही यंत्रणा आधी जागेवर आणा आणि नंतरच वीज दरवाढ करा, असा सल्ला कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिला.
कुडतरीचे स्थानिक नेते जिजस रोमाव यांच्यासह शुक्रवारी त्यांनी मडगावात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, वीज खात्याकडे वीजेचे साहित्य उपलब्ध नाही, त्यामुळे कुडतरी मतदारसंघाची आबाळ झाली आहे. राय-बोरी दरम्यानचा रस्ता काळोखात बुडून गेला आहे. वीज अभियंत्यांकडे साहित्य मागितले तर तेही हात वर करतात, असे सांगून येत्या १५ दिवसांत हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर कुडतरीच्या नागरिकांबरोबर आपण रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला.
कामुर्ली-लोटली या भागात जी भूमिगत वीजवाहिनी टाकली आहे, तिचेही काम अर्धवट टाकून दिले आहे. ही वीजवाहिनी नादुरुस्त झाली तर हा दोष शोधून काढण्यासाठी वीज खात्याकडे यंत्र उपलब्ध नाही. विजेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले स्काय लिफ्ट वाहन, क्रेन यांची तर वानवा आहेच, शिवाय एका कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती अजून केलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर हे भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण झाले नाही तर ते पूर्ण करून घेण्यासाठी नागरिक रस्त्यावर येतील, असा इशारा रोमाव यांनी दिला.
घरगुती विजेच्या बिलांत २0 टक्क्यांनी तर व्यावसायिक कारणासाठी वापरलेल्या विजेच्या बिलांत ७0 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. गोव्याच्या लोकांकडून सर्वांत अधिक महसूल हे खाते जमा करते. मात्र, त्या बदल्यात ग्राहकांना आवश्यक त्या सेवा का मिळत नाहीत, असा सवाल करून, येत्या विधानसभा अधिवेशनात आपण त्यावर आवाज उठवू, असे लॉरेन्स म्हणाले. (प्रतिनिधी)

ढँङ्म३ङ्म : 1707-टअफ-01
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स. सोबत जिजस रोमाव. (छाया : पिनाक कल्लोळी)

Web Title: Page 2: The power system collapses because there is no equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.