पान २ : राष्ट्रवादीची पत्रकार परिषद
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:52+5:302015-05-05T01:21:52+5:30
भ्रष्टाचाराबाबत बक्षीस

पान २ : राष्ट्रवादीची पत्रकार परिषद
भ रष्टाचाराबाबत बक्षीसराष्ट्रवादीची टीकापणजी : मुरगाव पालिकेकडून काही वर्षांपूर्वी खरेदी केल्या गेलेल्या कॉम्पॅक्टरबाबत पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून (एसीबी) आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. तरी देखील सरकारने आल्मेदा यांची नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (पीडीए) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. झिरो टॉलरन्स टू करप्शनच्या गोष्टी लोकांना सांगणारे सरकार भ्रष्टाचाराबाबत बक्षीस देत आहे असेच या नियुक्तीवरून वाटते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा आणि मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी सोमवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्या आमदाराची भ्रष्टाचाराबाबत चौकशी केली जात आहे, त्या आमदाराकडे सरकारने पीडीएसारखी संस्था तरी सोपवायला नको होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मग सरकारने पीडीएवरील आमदाराच्या नियुक्तीबाबत काय तो निर्णय घ्यायला हवा होता, असे डिमेलो म्हणाले. एसीबीकडून ज्या आमदाराची चौकशी केली जात आहे, त्यास कदंब वाहतूक महामंडळाचे चेअरमनपद व पीडीएचे अध्यक्षपद सरकार देते यावरून सर्वसामान्यांनी काय ते समजावे, असे जुझे फिलिप म्हणाले. कदंबमधील भंगार विक्रीचा हिशेब आपण चेअरमन आल्मेदा यांच्याकडे पत्र लिहून मागितला होता; पण त्यांनी त्या पत्राला प्रतिसादही दिला नाही. यावरून त्यांची वृत्ती कळून येते, असे जुझे फिलिप म्हणाले.दरम्यान, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग प्रमुख सैफुल्ला खान यांच्यावरही जुझे फिलिप यांनी टीका केली. राज्यात भाजपचे सरकार अधिकारावर आहे. सैफुल्ला मात्र भाजप नेत्यांवर टीका करण्यापेक्षा माझ्यावर दोषारोप करतात. ते काँग्रेस पक्षात राहून भाजपचे एजंट बनले आहेत, असे जुझे फिलिप म्हणाले.(खास प्रतिनिधी)(पान दोन)(जुझे फिलिपच्या चेहर्याचा फोटो वापरावा)