पान २- मायनिंग पीपल्स फ्रंटचे केंद्रीय वन, पर्यावरण मंत्र्यांना पत्र खाणींना विनाविलंब पर्यावरणीय परवाने देण्याची मागणी

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:09+5:302015-02-14T01:07:09+5:30

पणजी : खाणी पूर्ववत सुरू करण्याबाबत मान्यता देण्याच्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालावे आणि हा उद्योग तातडीने सुरू करावा, अशी लेखी मागणी मायनिंग पीपल्स फ्रंटने केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

Page 2- Mineral People's Front's Central Forest, Environment Minister demanded to give immediate permission for the letter mining | पान २- मायनिंग पीपल्स फ्रंटचे केंद्रीय वन, पर्यावरण मंत्र्यांना पत्र खाणींना विनाविलंब पर्यावरणीय परवाने देण्याची मागणी

पान २- मायनिंग पीपल्स फ्रंटचे केंद्रीय वन, पर्यावरण मंत्र्यांना पत्र खाणींना विनाविलंब पर्यावरणीय परवाने देण्याची मागणी

जी : खाणी पूर्ववत सुरू करण्याबाबत मान्यता देण्याच्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालावे आणि हा उद्योग तातडीने सुरू करावा, अशी लेखी मागणी मायनिंग पीपल्स फ्रंटने केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.
आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका आणि गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे समन्वयक सुहास नाईक यांनी या पत्रात गोव्यातील खाणींना तातडीने मान्यता मिळण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी जातीने लक्ष घालावेअशी मागणी केली आहे. राज्य सरकारने सर्व खाण लीजचे नूतनीकरण करणे आणि गोव्यातील खाण बंदी उटवण्याबाबत भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
मे २०१३ मध्ये नवी दिल्लीतील जंतरमंतरवर गोव्यातील खाण अवलंबित जनतेने दोन दिवशीय आंदोलन केले होते. जावडेकर यांनीही पाठिंबा देताना गोव्यातील खाण उद्योगाबाबतच्या समस्या दूर करून खाण उद्योग तातडीने सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते.
गोव्यातील ३० टक्के जनता प्रत्यक्षपणे काण उद्योगावरच अवलंबून असून गोव्यातील लोह खनिज उद्योगावर बंदी आणल्यामुळे या जनतेच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून यामुळे या जनतेवर आलेल्या आर्थिक संकटाची तीव्रता आणि त्याचे दूरगामी दुष्परिणामही या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहेत.

Web Title: Page 2- Mineral People's Front's Central Forest, Environment Minister demanded to give immediate permission for the letter mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.