पान 2 : मिकींना शिक्षेच्या कालावधीत सवलत अशक्यच : आयरिश
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:40+5:302015-10-03T00:20:40+5:30
पणजी : सडा कारागृहात असलेले आमदार मिकी पाशेको यांना शिक्षेच्या कालावधीत सवलत मिळू शकत नाही, असे आयरिश रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.

पान 2 : मिकींना शिक्षेच्या कालावधीत सवलत अशक्यच : आयरिश
प जी : सडा कारागृहात असलेले आमदार मिकी पाशेको यांना शिक्षेच्या कालावधीत सवलत मिळू शकत नाही, असे आयरिश रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.गोवा तुरुंग नियमावली 2006 मधील नियम 289 नुसार शिक्षेत सवलत देण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आचरण चांगले असावे लागते, तसेच शिस्तही विचारात घेतली जाते. मिकी यांनी तुरुंगात गणवेश घालण्यास नकार दिला होता. कारागृहात चांगले आचरण असल्यास दर महिन्याला 3 दिवस याप्रमाणे शिक्षेत सवलत देण्याचा अधिकार तुरुंग अधीक्षकांना आहे. मिकी यांनी कारागृहात नियम धाब्यावर बसवून मोबाईल फोनही वापरला आहे. सहा महिन्यांची शिक्षा कोर्टाने ठोठावल्यानंतर मिकी दोन महिने फरार होते, याकडेही आयरिश यांनी लक्ष वेधले आहे. 2006मध्ये पशुसंवर्धन खात्याचे मंत्री असताना मिकी यांनी वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केली होती. या प्रकरणात ते शिक्षा भोगत आहेत. (प्रतिनिधी)