पान २- लाचप्रकरणी अटकेतील पंचांची चौकशी सुरू : घराची झडती
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:18+5:302015-02-14T23:52:18+5:30
मांद्रे : लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले कोरगावचे माजी सरपंच तथा पंच सुदीप कोरगावकर व पंच डॉमनिक फॅर्नांडिस यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी कोरगाव येथे आणून त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. उपअधीक्षक सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

पान २- लाचप्रकरणी अटकेतील पंचांची चौकशी सुरू : घराची झडती
म ंद्रे : लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले कोरगावचे माजी सरपंच तथा पंच सुदीप कोरगावकर व पंच डॉमनिक फॅर्नांडिस यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी कोरगाव येथे आणून त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. उपअधीक्षक सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. दरम्यान, या लाच प्रकरणाशी पंचायतीचा काहाही संबंध नसल्याचे सरपंच पंढरी आरोलकर यांनी स्पष्ट केले आहे. हरमल येथील समाजकार्यकर्ते मार्गन त्रावासो यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाच्या अधिकार्यांनी पंच कोरगावकर व फॅर्नांडिस यांना मॉर्गन त्रावासो यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.दरम्यान, आपण कोरगाव-भटवाडी येथे घेतलेल्या जागेत कोणतेच बेकायदेशीर काम केले नाही. मग पंचायतीकडून ना हरकत दाखला मिळवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे तक्रारदार त्रावासो यांनी सांगितले.दरम्यान, कोरगाव येथील एका नागरिकाने त्रावासो यांनी कोरगाव-भटवाडी येथे घेतलेल्या जागेत चालेल्या कामाविषयी तक्रार दखल केल्याने या संदर्भात पंचायतीने त्रावासो यांना नोटीस पाठवून या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी अजून कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच ते पंचनाम्यावेळी हजर राहिले नाही, असे सरपंच आरोलकर यांनी सांगितले. मात्र या प्रकरणाचा अटक प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे ते म्हणाले. लाच देऊन प्रकरण मिटवणे किंवा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मला गरजच नाही. त्या ठिकाणी आपण कोणतेच बेकायदेशीर काम केले नाही. उलट तिथे असलेल्या नाल्यासाठी आपण दगड वापरून संरक्षण कुंपण उभारले असल्याचे त्रावासो यांनी स्पष्ट केले.पंचायतीकडून सामान्य माणसाला पिळण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. आपण भ्रष्टाचाराविविरोधी असून पंचायत पातळीवर चाललेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहे, असे ते त्यानी सांगितले. (प्रतिनिधी)फोटो ओळी-कोरगावचे पंच सुदीप कोरगावकर व डॉमनिक फेर्नांडिस यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्यानंतर नेताना.पंच सुदीप कोरगावकर व डॉमनिक फेर्नांडिस यांना अटक करून वाहनातून घेऊन जाताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक. (छाया : लक्ष्मण ओटवणेकर)