पान २ साठी - कत्तलखान्यांची तपासणी करा - हरित लवादाचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:04+5:302015-04-24T00:55:04+5:30
पणजी : बेकायदा कत्तलखान्यांची तसेच तेथे होणार्या पाण्याच्या प्रदूषणाची तपासणी करावी, असा अंतरिम आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे.

पान २ साठी - कत्तलखान्यांची तपासणी करा - हरित लवादाचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश
प जी : बेकायदा कत्तलखान्यांची तसेच तेथे होणार्या पाण्याच्या प्रदूषणाची तपासणी करावी, असा अंतरिम आदेश राष्ट्रीय हरित लवादाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. ॲनिमल रेस्क्यू स्कॉडने जनावरांच्या बेकायदा कत्तलीचा विषय लवादाकडे नेला होता. न्यायमूर्ती व्ही. आर. किणगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या प्रकरणी उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्न व औषध प्रशासनाने वेळ मागितल्याने चार आठवड्यांची मुदत लवादाने दिलेली आहे. कत्तलीच्या ठिकाणी होणार्या पाणी प्रदूषणाचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. १९७४ च्या जल (संवर्धन व प्रदूषण नियंत्रण) कायद्यातील कलम ३३ अ नुसार कारवाई झाली पाहिजे, असे लवादाने बजावले आहे. फौजदारी दंड संहितेच्या कलम १३३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढण्याचे अधिकारही संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत. ॲनिमल रेस्क्यू स्कॉडने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाविरुद्ध लवादाकडे सादर झालेल्या याचिकेत राज्यात बेकायदा कत्तलखाने चालविले जात असल्याचा आरोप करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)