पान २ : वाळवंटीच्या अस्तित्वाची लढाई अंतिम टप्प्यात विर्डीप्रश्नी आज सुनावणी
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:45+5:302015-05-05T01:21:45+5:30
डिचोली : विर्डी धरण प्रकल्प महाराष्ट्राने पुढे रेटल्याने वाळवंटी नदी संकटात असून या अस्तित्वाच्या लढाईसाठी उद्या (दि.५) नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

पान २ : वाळवंटीच्या अस्तित्वाची लढाई अंतिम टप्प्यात विर्डीप्रश्नी आज सुनावणी
ड चोली : विर्डी धरण प्रकल्प महाराष्ट्राने पुढे रेटल्याने वाळवंटी नदी संकटात असून या अस्तित्वाच्या लढाईसाठी उद्या (दि.५) नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. गोव्यातर्फे, विर्डी धरण बेकायदा असून महाराष्ट्राने सर्व नियमांना धाब्यावर बसवताना बेकायदेशीर काम केल्याचे अनेक पुरावे सादर केले आहेत. लवादाने गोव्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर आता ५ रोजी महाराष्ट्राला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. गोव्याने आपली बाजू भक्कमपणे मांडताना विर्डी धरण गोव्यासाठी कसे व किती घातक आहे याचे सर्व पुरावे सादर केले आहेत. गोव्याकडे येणारा पाण्याचा प्रवाह बंद करता येणार नाही. तसे झाल्यास वाळवंटी नदी व तिच्यावर असलेले दोन जलशुद्धीकरण प्रकल्प संकटात येणार असल्याने गोव्याचे ॲड. जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी लवादासमोर सादर केले आहे. हे धरण पूर्णपणे बेकायदा असल्याने ते काम कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. उद्याच्या सुनावणीला महाराष्ट्राने आपली बाजू मांडल्यानंतर गोव्यातर्फेही पुरवणी युक्तिवाद सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कोणता पावित्रा घेणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)आठ नवी धरणे उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राने गोव्याच्या पाण्याचा प्रवाह गिळंकृत करण्याचा डाव आखलेला असून विर्डी परिसरात ७ पाटबंधारे व धरणे उभारण्याचा प्रस्ताव पुढे रेटलेला आहे. या सर्व गोष्टींमुळे वाळवंटी प्रवाह व गोव्यात येणारे पाणी अडणार असून त्याचे गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागणार आहेत, असे राजेंद्र केरकर यांनी सांगितले. फोटो : वाळवंटीच्या अस्तित्वावर घाला घातला जात असून ती अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. (छाया : विशांत वझे)