पान 2 : जोड बातमी. पणजीतील पाच मार्ग एकेरी
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:14+5:302015-07-31T22:25:14+5:30
शहरात 1 सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी मार्ग नियम अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले जातील. तरी सध्या याची तारीख निश्चित सांगता येणार नाही. महापालिकेच्या बैठकीत पालिका मंडळाच्या सूचनांवर वरिष्ठांचा सल्ला घेतला जाईल आणि त्याप्रमाणे पुढील अंमलबजावणीबाबत विचार केला जाईल. एकेरी मार्ग अंमलबजावणी करण्यासाठी काही साधनसुविधा आणि वाहतूक पोलिसांची आवश्यकता भासेल, असे आंगले यांनी सांगितले.

पान 2 : जोड बातमी. पणजीतील पाच मार्ग एकेरी
श रात 1 सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी मार्ग नियम अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले जातील. तरी सध्या याची तारीख निश्चित सांगता येणार नाही. महापालिकेच्या बैठकीत पालिका मंडळाच्या सूचनांवर वरिष्ठांचा सल्ला घेतला जाईल आणि त्याप्रमाणे पुढील अंमलबजावणीबाबत विचार केला जाईल. एकेरी मार्ग अंमलबजावणी करण्यासाठी काही साधनसुविधा आणि वाहतूक पोलिसांची आवश्यकता भासेल, असे आंगले यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका मंडळात नगरसेवक रुद्रेश चोडणकर यांनी शहरातील विकासकामांसाठी 2011 सालापासून नेमणूक केलेल्या सल्लागारांची सूची देण्यात यावी, अशी मागणी केली. त्याचबरोबर सल्लागारांनी केलेले काम आणि त्यांना देण्यात आलेले मानधनही याबाबतची माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. बहुतांश नगरसेवकांनी या मागणीला दुजोरा दिला. महापालिकेच्या येणार्या सर्वसाधारण बैठकीत याबाबतची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन महापौर शुभम चोडणकर यांनी दिले. हे मार्ग एकेरी होतील..वाहतूक खात्याने एकेरी मार्गासाठी अधोरेखित केलेल्या मार्गांत दादा वैद्य मार्ग, एम.जी. रोड, महापालिका मार्ग ते फेरी पॉइंट, मिनेझिस ब्रागांझा मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग यांचा समावेश आहे.