पान 2 : रूपेशविरुध्द चौथा गुन्हा - लैंगिक छळ प्रकरण : तीनवेळा समन्स धुडकावल्याने चौथ्यांदा समन्स
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:24+5:302015-10-03T00:20:24+5:30
पणजी : लैंगिक छळ प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार रूपेश सामंत याच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली असून त्यावरून रूपेश याच्याविरुध्द भादंसंच्या 354 (अ) आणि 509 या कलमांखाली चौथा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीनवेळा काढलेले समन्स रूपेश याने धुडकावल्याने शुक्रवारी त्याला चौथ्यांदा समन्स बजावण्यात आले असून शनिवारी (दि. 3) हजर राहण्यास बजावले आहे.

पान 2 : रूपेशविरुध्द चौथा गुन्हा - लैंगिक छळ प्रकरण : तीनवेळा समन्स धुडकावल्याने चौथ्यांदा समन्स
प जी : लैंगिक छळ प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार रूपेश सामंत याच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली असून त्यावरून रूपेश याच्याविरुध्द भादंसंच्या 354 (अ) आणि 509 या कलमांखाली चौथा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीनवेळा काढलेले समन्स रूपेश याने धुडकावल्याने शुक्रवारी त्याला चौथ्यांदा समन्स बजावण्यात आले असून शनिवारी (दि. 3) हजर राहण्यास बजावले आहे. नव्याने आलेली फिर्यादी पीडित महिला रूपेश ज्या ठिकाणी काम करीत होता त्या केबल न्यूज चॅनलची माजी कर्मचारी आहे. ही घटना याच वर्षी (2015) घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रूपेश याच्याविरुध्द आतापर्यंत एकूण पाचजणींच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यातील चार प्रकरणांत पोलिसांनी विनयभंग आणि लैंगिक छळाचे गुन्हे नोंदविले आहेत. एक तक्रार पूरक म्हणून चौकशीसाठी घेतली आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार करणे, अश्लील चाळे करणे तसेच लैंगिक संबंधांची मागणी करणे, असे आरोप त्याच्यावर आहेत. (प्रतिनिधी) - शारीरिक संबंध, लैंगिक गोष्टीची मागणी करणे, महिलेच्या मनाविरुध्द अश्लील चित्रफिती दाखवणे, अश्लील शेरेबाजी करणे आदी प्रकरणांत भादंसंच्या कलम 354 अ खाली गुन्हे नोंदवले जातात. - महिलेच्या विनयभंग प्रकरणात भादंसंच्या कलम 509 खाली गुन्हा नोंदविला जातो. महिलेला उद्देशून अश्लील शेरेबाजी, हातवारे करणे यासाठी हा गुन्हा नोंदविला जातो. ...............