पान २ : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात फालोरोंचा आरोप : साळगाव गट काँग्रेसची सभा

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:08+5:302015-07-08T23:45:08+5:30

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात

Page 2: Falso accusations in the state crisis due to wrong policies of government: Salgaon group Congress meeting | पान २ : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात फालोरोंचा आरोप : साळगाव गट काँग्रेसची सभा

पान २ : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात फालोरोंचा आरोप : साळगाव गट काँग्रेसची सभा

कारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य संकटात
साळगाव गट काँग्रेसची सभा
साळगाव : मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपा सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या खिशातून वीज आणि पाणी बिलांचे पैसे वसूल करीत आहे. हे सरकार दिशाहिन झाले असून जनता सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आर्थिक संकटात आले असल्याचा आरोप लुईिझन फालेरो यांनी केला.
साळगाव गट काँग्रेस समितीने घेतलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस, उपाध्यक्ष मोती देसाई, एम.के. शेख, प्रवक्ते यतीश नायक, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, मिनीन पेरीस इत्यादी उपस्थित होते.
फालेरो पुढे म्हणाले, भाजपा जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करू शकले नाही. या सरकारने हल्लीच पाणी दर १00 टक्के तर वीज दर ३५ टक्क्यांनी वाढवला आहे. राज्यात महागाई वाढली आहे. निवडणुकांवेळी भाजपाने नागरिकांना अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते असफल ठरले आहेत. देशात काँग्रेस पक्षच चांगली विकासकामे आणि नागरिकांसाठी कल्याणाची धोरणे आखू शकतो, असे ते म्हणाले.
............
काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना आणि लोकशाही जपणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षात जास्तीत जास्त युवकांनी साहभागी व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात येतील, असे या वेळी फालेरो यांनी सांगितले.
.................
गेल्या साडेतीन वर्षांत सरकारने खनिज व्यवसाय पूर्णपणे बंद करून टाकला. औद्योगिक वसाहतीत कोणताही विकास झालेला नाही. राज्यात पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. तसेच अल्पसंख्याकांवरही हल्ले होऊ लागले आहेत, असे फालेरो यांनी सांगितले.
(जोड बातमी आहे...

Web Title: Page 2: Falso accusations in the state crisis due to wrong policies of government: Salgaon group Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.