पान 2 - गुन्हा अन्वेषण विभागाकडे आमदार गावकरांविरुद्ध तक्रार

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:35+5:302015-08-12T23:54:35+5:30

-‘साग’कडून अनधिकृतरित्या पाच लाखांचा निधी मिळविल्याचा आरोप

Page 2 - Complaint against District Collector of Crime Investigation Department | पान 2 - गुन्हा अन्वेषण विभागाकडे आमदार गावकरांविरुद्ध तक्रार

पान 2 - गुन्हा अन्वेषण विभागाकडे आमदार गावकरांविरुद्ध तक्रार

-‘
साग’कडून अनधिकृतरित्या पाच लाखांचा निधी मिळविल्याचा आरोप
पणजी : अखिल गोवा चॉकबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाची मान्यता नसलेल्या संघटनेसाठी पाच लाख रुपयांचा निधी अनधिकृतरीत्या बळकावल्याचा आरोप करीत अँड. आयरिश रॉड्रिग्स यांनी दक्षता तसेच गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीत आयरिश यांनी गावकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. जनतेचा पैसा असा अनधिकृतरित्या बळकावणे योग्य नाही. आमदार गावकर यांनी ‘साग’ची मान्यता नसलेल्या संघटनेसाठी ही रक्कम निधी म्हणून मिळवली आहे. गावकर यांनी 1 एप्रिल 2013 मध्ये अखिल गोवा चॉकबॉल संघटनेचे अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी ‘साग’कडे 5 लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी अर्ज केला होता. अनधिकृत संघटनेस ‘साग’कडून निधी दिला जात नाही, अशी हरकत त्या वेळी सागच्या अधिकार्‍यांनी घेतली होती. असे असतानाही क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे, 25 एप्रिल 2013 रोजी निधी मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. अखेर 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या आदेशानंतर पाच लाखांचा निधी संघटनेला देण्यात आला. 7 मे रोजी चार लाख रुपये आणि 3 सप्टेंबर 2014 रोजी एक लाख असे धनादेशाद्वारे ही रक्कम संघटनेला प्राप्त झाली. मात्र, सागची मान्यता नसलेल्या संघटनांना हा निधी कसा काय मिळू शकतो, असा प्रश्न रॉड्रिग्स यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2 - Complaint against District Collector of Crime Investigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.