पान २ : सहकार दुरुस्त्या भल्यासाठीच : खलप

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:13+5:302015-07-16T15:56:13+5:30

पणजी : सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सहकार संस्थांत उच्चपदे भूषविण्यास मनाई करणार्‍या सहकार कायद्यातील दुरुस्त्या या भल्यासाठीच असल्याचे माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.

Page 2: Co-operative Reforms | पान २ : सहकार दुरुस्त्या भल्यासाठीच : खलप

पान २ : सहकार दुरुस्त्या भल्यासाठीच : खलप

जी : सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सहकार संस्थांत उच्चपदे भूषविण्यास मनाई करणार्‍या सहकार कायद्यातील दुरुस्त्या या भल्यासाठीच असल्याचे माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.
नवीन सहकारी दुरुस्तींच्या बाबतीत अनेकांनी विरोध दर्शविला असला तरी नवीन दुरुस्ती या चांगल्या असून आपण स्वत: त्याचे पालन केले असल्याचे खलप यांनी सांगितले. या दुरुस्तीनुसार सलग दोन वेळा म्हणजेच १० वर्षे एका सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव पद भूषविता येत नाही. म्हापसा अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष या वेळी खलप यांचे पुत्र आश्विन खलप हे म्हापसा अर्बनचे अध्यक्ष झाले आहेत.
म्हापसा अर्बन गोव्याबाहेर शाखा सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा खातेदारकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खाणग्रस्तांना म्हापसा अर्बनमधून देण्यात आलेल्या कर्जाची एकूण रक्कम ही केवळ ३ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे म्हापसा अर्बनवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Page 2: Co-operative Reforms