पान 2 - उमेदवार निवड पुढील आठवड्यात- र्पीकर

By Admin | Updated: January 8, 2016 02:13 IST2016-01-08T02:13:54+5:302016-01-08T02:13:54+5:30

(र्पीकरांच्या फोटोसह)

Page 2 - Candidates Selection Next Week- Speaker | पान 2 - उमेदवार निवड पुढील आठवड्यात- र्पीकर

पान 2 - उमेदवार निवड पुढील आठवड्यात- र्पीकर

(र
्पीकरांच्या फोटोसह)
भाजपची उमेदवार निवड
पुढील आठवडाभरात
र्पीकर यांची माहिती (पणजी महापालिका)
पणजी : पणजी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीसाठी इच्छुकांशी बोलणी सुरूच ठेवली आहेत. प्रभागवार आपण चर्चा करत असून पुढील आठवडाभरात उमेदवार निवड पूर्ण होईल, असे संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले.
र्पीकर हे आल्तिनो येथे शशिकला काकोडकर यांच्या निवासस्थानी गुरुवारी आले होते. काकोडकर यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देऊन र्पीकर परतत असताना या प्रतिनिधीने र्पीकर यांना महापालिका निवडणुकीविषयी विचारले असता, ते म्हणाले की उमेदवार निवडीसाठी आमची प्रक्रिया सुरू आहे. आपण विविध घटकांशी बोलत आहे. इच्छूक उमेदवार, कार्यकर्ते व लोकांचे मत जाणून घेत आहे. अजून उमेदवार निवडले गेलेले नाहीत पण येत्या आठवड्यात आपण पुन्हा गोव्यात येईन तेव्हा महापालिकेसाठी उमेदवार निवड पूर्ण होईल.
दरम्यान, र्पीकर यांच्यासोबत आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हेही इच्छुक उमेदवारांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. भाजपच्या विद्यमान नगरसेवकांची व विरोधी गटातील नगरसेवकांची प्रगती याबाबतचाही अंदाज घेतला जात आहे. येत्या 6 मार्च रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी 11 जानेवारी रोजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग फेररचनेची फेररचनेची प्रक्रिया पूर्ण होईल असे सुत्रांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Page 2 - Candidates Selection Next Week- Speaker