पान २ : लाचखोर पाठपुरावा
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:45+5:302015-02-14T23:51:45+5:30
कोरगाव पंचायत बरखास्त करा

पान २ : लाचखोर पाठपुरावा
क रगाव पंचायत बरखास्त करामॉर्गन त्रावासो : आणखी दोघा पंचांना अटक व्हावीमांद्रे : हरमल येथील लाच प्रकरणात कोरगाव पंचायतीचे रंगेहाथ पकडलेले केवळ दोघेच पंच सदस्य नसून आणखी दोघा पंच सदस्यांचा त्यात समावेश होता. त्यांनाही लवकरच अटक होईल. त्यामुळे पूर्ण कोरगाव पंचायत मंडळ भ्रष्टाचारी असून पंचायत संचालकांनी कोरगाव पंचायत बरखास्त करावी, अशी मागणी समाज कार्यकर्ते मॉर्गन त्रावासो यांनी पत्रकान्वये केली आहे.आपल्याकडे पंच सुदीप कोरगावकर, डॉमनिक फर्नांडिस व अन्य दोघा पंच सदस्यांनी पाच लाखांची मागणी केली होती. तत्संबंधीचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू असलेल्या चौकशीतून ते स्पष्ट होईल. शिवाय या लाच प्रकरणात अप्रत्यक्ष सहभाग असलेल्यांचेही पितळ उघडे पडणार आहे, असे त्रावासो यांनी पत्रकात म्हटले आहे.कोरगाव पंचायत मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीचे निवेदन आपण पंचायत संचालकांची भेट घेऊन देणार आहे, असेही त्रावासो यांनी म्हटले आहे. सध्या आपल्या रडारवर पेडणे तालुक्यातील दोन पंचायती आहेत व एक पंचायत सचिव आहेत. आपल्या भ्रष्टाचार स्वच्छतेच्या मोहिमेत अनेक पंचायतींचे पंच सदस्य, काही सरपंच, शासकीय अधिकारी, ड्रग्ज माफिया, काही प्रतिष्ठित व समाजाचे जबाबदार प्रतिनिधी यांचा समावेश आहे. यापैकी अनेकांचे पुरावे आपण गोळा केलेले आहेत, असे त्रावासो यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)चौकटकोठडीत वाढदरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी अटक केलेले कोरगाव पंचायतीचे पंच सुदीप कोरगावकर व डॉमनिक फर्नांडिस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बुधवार १८ फेब्रुवारीपर्यंत कोठडी वाढवून घेतली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोठडी आणखी वाढवून घेण्यात येणार असल्याचे या विभागाचे उपअधीक्षक बोशेट सिल्वा यांनी सांगितले आहे.