पान २ - धुल्लय नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:45+5:302015-06-02T00:03:45+5:30
फोंडा : कोडार येथे नदीपात्रात सांताक्रुज येथील आयआरबीचा जवान बुडाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. ३१) संध्याकाळी सिकेटी-नावेली येथील प्रज्योत पुंडलिक शिरोडकर (२०, मूळ रा. कारवार) हा बुडाला होता. सोमवारी (दि. १) नदीपात्रात तरंगणारा त्याचा मृतदेह स्थानिकांनी पाण्याबाहेर काढला.

पान २ - धुल्लय नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
फ ंडा : कोडार येथे नदीपात्रात सांताक्रुज येथील आयआरबीचा जवान बुडाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. ३१) संध्याकाळी सिकेटी-नावेली येथील प्रज्योत पुंडलिक शिरोडकर (२०, मूळ रा. कारवार) हा बुडाला होता. सोमवारी (दि. १) नदीपात्रात तरंगणारा त्याचा मृतदेह स्थानिकांनी पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोड्यातील काही युवक कुंभारवाडा-धुल्लय येथे नदीपात्रात पोहण्यासाठी आले होते. प्रज्योत हा शिरोड्यात आपल्या मावशीच्या घरी आला होता. तोही या युवकांत सहभागी झाला. सुमारे ११ वाजता युवकांचा गट कुंभारवाड्यात आला. रविवार असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात युवावर्गाची ये-जा सुरू होती. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध भागांतून आलेले सुमारे दीडशे ते दोनशे युवक डीजेच्या तालावर आणि दारूच्या नशेत दंगा करीत होते. स्थानिकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता या युवकांमधील काहीजण स्थानिकांच्या अंगावर धावून गेले तसेच स्थानिकांवर दगड फेकण्याचेही प्रकार घडले. यामुळे स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, पोलीस कुणावरही कसलीच कारवाई न करता माघारी फिरले.संध्याकाळी हे युवक पाण्यात उतरले असता प्रज्योत शिरोडकर हा खोल पाण्यात ओढला गेला. या घटनेची माहिती फोंडा पोलीस तसेच अग्निशमन दलाला देण्यात आल्यावर अधिकार्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलातर्फे पाण्यात प्रज्योतचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संध्याकाळ झाल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. सोमवारी दुपारी प्रज्योत याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. स्थानिक नागरिक गोपीनाथ नाईक यांनी तो बाहेर काढला. प्रज्योत याचे कुटुंब गोव्यातच आहे. तो हल्लीच वेर्णा येथील एका खासगी आस्थापनात कामाला लागला होता. धुल्लय-कुंभारवाडा, कोडार या भागांत पोलिसांची कायमस्वरूपी गस्त ठेवण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)