पान १ : कुचेली येथील तरुण अपघातात जागीच ठार
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:55+5:302015-05-05T01:21:55+5:30
बार्देस : पर्रा येथील लोटलीकर बारजवळील गतिरोधकावर हिरो होंडा मोटारसायकलने (जीए ०३ एम ९९३४ ) झेप घेतल्याने दुचाकीवरील दोन्ही प्रवासी खाली पडले. यातील चालक विनायक साबाजी पार्सेकर (२४, खडपावाडा, कुचेली) जागीच ठार झाला. मागे बसलेला एकजण जखमी झाला. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक व सतीश खडगेरी (गंगानगर) दुचाकीवरून कळंगुटहून रात्री १० च्या सुमारास पर्रा मार्गे घरी येत होते. गतिरोधकावर त्याची दुचाकी उडाली असता दोघे खाली पडले. चालकाचे डोके रस्त्याच्या बाजूला घराच्या गेटवर आपटले व तो जागीच ठार झाला. सतीश गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)

पान १ : कुचेली येथील तरुण अपघातात जागीच ठार
ब र्देस : पर्रा येथील लोटलीकर बारजवळील गतिरोधकावर हिरो होंडा मोटारसायकलने (जीए ०३ एम ९९३४ ) झेप घेतल्याने दुचाकीवरील दोन्ही प्रवासी खाली पडले. यातील चालक विनायक साबाजी पार्सेकर (२४, खडपावाडा, कुचेली) जागीच ठार झाला. मागे बसलेला एकजण जखमी झाला. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक व सतीश खडगेरी (गंगानगर) दुचाकीवरून कळंगुटहून रात्री १० च्या सुमारास पर्रा मार्गे घरी येत होते. गतिरोधकावर त्याची दुचाकी उडाली असता दोघे खाली पडले. चालकाचे डोके रस्त्याच्या बाजूला घराच्या गेटवर आपटले व तो जागीच ठार झाला. सतीश गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. (प्रतिनिधी) फोटो : अपघातात सापडलेली मोटारसायकल. (०४०५-एमएपी-०५)