पान १ : कचराप्रश्नी नगरसेवकांची आज बैठक
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:25+5:302014-12-20T22:28:25+5:30
कचराप्रश्नी नगरसेवकांची आज बैठक

पान १ : कचराप्रश्नी नगरसेवकांची आज बैठक
क राप्रश्नी नगरसेवकांची आज बैठकसंप चालूच : घरोघरी कचरा साचून, मनपाने घेतले शंभरावर कामगार पणजी : महापालिका कामगारांनी चौथ्या दिवशीही संप चालू ठेवल्याने शहरात कचरा तुंबला. संप मोडून काढण्यासाठी म्हणून भरती केलेल्या कामगारांची संख्या १00 वर पोचली आहे. भर नाताळात या संपामुळे कचर्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाल्याने आयुक्तांनी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. मनपाने १00 कामगार घेऊन ट्रकही लावले असले तरी शहरातील कचरा पूर्णपणे उचलणे शक्य झालेले नाही. घरोघरी फिरून नेला जाणारा कचराही उचलला गेलेला नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा साचून राहिल्याने काही ठिकाणी कचर्यात कीडे पडले. स्थिती अशीच कायम राहिल्यास रोगराईची भीती व्यक्त होत आहे. घराघरांमध्ये तुंबून राहिलेल्या कचर्याबद्दल विचारले असता शनिवार-रविवारपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी केला. गुरुवारी चार-पाच प्रभागांमध्ये घराघरांतील कचरा उचलण्याचे काम सुरू केले असून शुक्रवारी आणखी काही प्रभाग हाती घेण्यात आले. हॉटेलांचा ओला कचरा प्राधान्यक्रमे उचलण्यात येत आहे; कारण तो न उचलल्यास दुर्गंधी पसरून रोगराई होऊ शकते. कचरा उचलण्यासाठी लावलेले ६ ट्रक वरचेवर फेर्या करीत आहेत. संपावरील काही कामगार विनाअट सेवेत रुजू झाल्याचा दावा संजित यांनी केला. यात चालक तसेच सफाई कामगार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)(आणखी वृत्त २ वर)