पान १ -मुतालीकांवर तिसर्यांदा बंदी
By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:29+5:302015-07-16T15:56:29+5:30
पणजी : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना तिसर्यांदा गोव्यात प्रवेशबंदी करणारा आदेश उत्तर गोवा प्रशासनाने जारी केला आहे. ही बंदी सतत तिसर्यांदा करण्यात आली असून त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यांच्या भडकावू भाषणामुळे काही समाजाच्या भावना दुखावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दंगली निर्माण होऊन आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे ही प्रवेशबंदी करण्यात आल्याचे उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांनी आदेशात म्हटले आहे. बंदीचा आदेश १६ जुलैपासून लागू होत आहे.

पान १ -मुतालीकांवर तिसर्यांदा बंदी
प जी : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना तिसर्यांदा गोव्यात प्रवेशबंदी करणारा आदेश उत्तर गोवा प्रशासनाने जारी केला आहे. ही बंदी सतत तिसर्यांदा करण्यात आली असून त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यांच्या भडकावू भाषणामुळे काही समाजाच्या भावना दुखावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दंगली निर्माण होऊन आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे ही प्रवेशबंदी करण्यात आल्याचे उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांनी आदेशात म्हटले आहे. बंदीचा आदेश १६ जुलैपासून लागू होत आहे. दरम्यान, गोवा सरकारकडून करण्यात आलेल्या प्रवेशबंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात मुतालिक यांची आव्हान याचिका काही दिवसांपूर्वी फेटाळण्यात आली होती. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचेही मुतालिक यांचे वकील नागेश ताकभाते यांनी म्हटले होते. (प्रतिनिधी)