पान १- मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान ती गात होती रवींद्र संगीत
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
बंगळुरु- वेदनांची जाणीव देण्याचे काम करणार्या मेंदूला स्वत:ला मात्र वेदना होत नाहीत, या वैद्यक शास्त्रातील तथ्याचा अद्भुत परिचय देणारी विरळा शस्त्रक्रिया बंगळुरु येथील शल्य विशारदांनी पार पाडली. विशेष म्हणजे ज्या महिलेवर ही अवघड शस्त्रक्रिया झाली, ती शस्त्रक्रिया सुरू असताना चक्क रवींद्र संगीत आळवत होती.

पान १- मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान ती गात होती रवींद्र संगीत
ब गळुरु- वेदनांची जाणीव देण्याचे काम करणार्या मेंदूला स्वत:ला मात्र वेदना होत नाहीत, या वैद्यक शास्त्रातील तथ्याचा अद्भुत परिचय देणारी विरळा शस्त्रक्रिया बंगळुरु येथील शल्य विशारदांनी पार पाडली. विशेष म्हणजे ज्या महिलेवर ही अवघड शस्त्रक्रिया झाली, ती शस्त्रक्रिया सुरू असताना चक्क रवींद्र संगीत आळवत होती. सरिता (नाव बदलले आहे) या प. बंगालमधील बरद्वानच्या ३४ वर्षीय महिलेवर येथील सीता भटेजा रुग्णालयात हा प्रयोग करण्यात आला. मेंदूवर झालेल्या साडे तीन तासांच्या शस्त्रक्रियेच्या काळात तिच्या बाकीच्या क्षमता जागृत ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी ही अवघड शस्त्रक्रिया चालू असताना तिने आवडते रवींद्र संगीत गाण्यास प्रारंभ केला. शस्त्रक्रिया सुरु झाल्यानंतर तिची शुद्घ तर हरपत नाही ना, म्हणजेच तिच्या बाकीच्या संवेदना जागृत आहेत ना, याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टरांनी तिला अनेक साधे प्रश्न विचारले. आठवड्याचे वार किती, आवडता चित्रपट कोणता , १०० आकडे सरळ व उलटे मोजून दाखव, असा संवाद सुरू असतानाच तिने रवींद्र संगीत गाण्यास सुरुवात केली. (वृत्तसंस्था)------------सरिताच्या मेंदूत डाव्या बाजूला ट्यूमर झाला होता. हा ट्यूमर मेंदूतील बोलण्याच्या क्रियेचे नियंत्रण करणार्या केंद्राजवळ असल्याने तो काढताना तिच्या बोलण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ नये अशी डॉक्टरांची इच्छा होती. त्यामुळे तिला याची पूर्वकल्पना देऊन शस्त्रक्रियेच्या काळात जागृत ठेवण्यात आले. -------------या रुग्णालयाचे मेंदूकडून मिळणार्या संदेशतूनच वेदनांची जाणीव होत असली तरीही मेंदूला स्वत:ला मात्र काही केल्यास वेदना होत नाहीत. त्यामुळे मेंदूची शस्त्रक्रिया चालू असताना माणूस जागृत राहू शकतो. - न्यूरोसर्जन अरविंद भटेजा