पान १ - ग्रीस आणि युरोपियन देशांत पुन्हा वाटाघाटीचे संकेत
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:17+5:302015-07-06T23:34:17+5:30

पान १ - ग्रीस आणि युरोपियन देशांत पुन्हा वाटाघाटीचे संकेत
>ग्रीस आणि युरोपियन देशांत पुन्हा वाटाघाटीचे संकेत - ग्रीसच्या अर्थमंत्र्यांचा राजीनामाअथेन्स - ग्रीक नागरिकांनी बेलआऊट प्रस्ताव स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे युरोपियन देशांच्या गोंधळात वाढ झाली असून संकटग्रस्त ग्रीसने आता युरोझोनमधून बाहेर पडू नये, म्हणून त्यांनाच चुचकारण्याची वेळ युरोपियन देशांवर आली आहे. ग्रीसच्या नकारार्थी सार्वमतानंतरही मदतकर्त्या संघटना इसीबी व इसी तसेच आयएमएफ यांनी वाटाघाटीचे संकेत दिले आहेत. ग्रीसच्या जनतेने विरोधात मतदान करूनही त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे संकेत मदतकर्त्या देशांनी आणि संस्थेनी देण्याचे कारण म्हणजे. ग्रीसमध्ये झालेल्या मतदानानंतर ग्रीसचे अर्थमंत्री यानिस व्हरोफाकीस यांनी दिलेला राजीनामा. गेल्या काही महिन्यात ग्रीस अडचणीत आल्यानंतर देणगीदार देशांशी वाटाघाटी करण्यास यानिस यांनी नेहमीच विरोध केला होता. यानिस यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर युरो चलनाचे मूल्य वाढले, ही बाब मदतकर्त्या देशांसाठी उत्साहजनक होती. दरम्यान, कर्जातून सुटका होण्याकरिता आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून आणखी निधी (बेलआउट पॅकेज)मिळण्याच्या मोबदल्यात तुम्ही कठोर आर्थिक शिस्त स्वीकारण्यास तयार आहात काय, असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. युरोपियन देशांचे हे बेलआऊट पॅकेज ग्रीसमधील जनतेने बहुमताने नाकारले आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या मतदानात ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी विरोधात मतदान केले. (वृत्तसंस्था)---------------चौकट - युरोपीयन नेत्यांच्या भेटी नकारार्थी सार्वमतानंतर युरोपीय नेते परस्परांना भेटत असून , सर्वात प्रथम जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस होलंदे यांनी पॅरिस येथे भेटत आहेत. ग्रीसच्या नागरिकांनी काटकसर योजनाना विरोध दर्शविण्यासाठी नकारार्थी मत दिले असले तरीही त्यातून युरोपचे नुकसान व्हावे असे कोणालाही वाटत नाही असे मर्केल यांनी म्हटले आहे. युरोपीयन युनियनच्या नेत्यांची परिषद मंगळवारी होत आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी जाहीर केले आहे.