पान 1
By Admin | Updated: August 10, 2015 00:28 IST2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30

पान 1
>कामत यांच्या जामिनास पोलिसांची दुसरी हरकत प्रमुख संशयित आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला हरकत घेणारे दुसरे स्पष्टीकरण पोलिसांच्यातर्फे न्यायालयाला सादर केले जाणार आहे. काईम बॅचने पहिले म्हणणे सादर केले आहे, त्यात संशयीत आनंद वाचासुंदर आणि हवाला दलाल रायचंद्रू सोनी यांच्या कबुली जबाबाचा उल्लेक नव्हता. तसेच सोनी याचा कर्मचारी मुकेश भारती याच्या जबाबाचाही उल्लेख नव्हता. त्यामुळे या तिन्ही गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी पोलिसांना पुरवणी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. कबुली जबाबात सोनी यांने आपण लाचचे पैसे गोव्यात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. मुके श यानी ते पैसे लुईस बर्जर कंपनीच्या तत्कालीन अधिकार्यांना दिल्याचा जबाब दिलेला आहे. वाचासुंदर यांनी ही लाच आपल्या उपस्थितीत दिल्याचे जबाबात म्हटलेले आहे. या सर्व जबाबांचा पुरवणीत स्पष्ट उल्लेख करणे पोलिसांना महत्वाचे वाटते.