शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आपल्या मित्राचं स्वागत कराण्यासाठी पुन्हा 'नमस्ते ट्रम्प' रॅली करणार का?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 17:03 IST

चिदंबरम यांनी गुरुवारी मोदींना चिमटा काढत, ते आपल्या मित्राला सन्मानित करण्यासाठी आणखी एका नमस्ते ट्रम्प' रॅलीचे आयोजन करणार का? असा प्रश्न केला आहे. (Namaste Trump)

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरस संक्रमणाबरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोही वाढताना दिसत आहेत. आता काँग्रेसनेते पी चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. चिदंबरम यांनी गुरुवारी मोदींना चिमटा काढत, ते आपल्या मित्राला सन्मानित करण्यासाठी आणखी एका नमस्ते ट्रम्प' रॅलीचे आयोजन करणार का? असा प्रश्न केला आहे. ट्रम्प यांनी नुकताच, चीन आणि रशियाबरोबरच भारतावरही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवल्याचा आरोप केला आहे. यानंतर चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. 

चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटले आहे, “डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि रशियाबरोबरच भारतावरही कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी तीनही देशांवर सर्वाधिक हवा प्रदूषण करण्याचा आरोपही केला. मोदी आपल्या मित्राला सन्मानित करण्यासाठी आणखी एक 'नमस्ते ट्रम्प' रॅलीचे आयोजन करणार का?"

ट्विटमध्ये चिंदम्बरण पुढे म्हणाले, "प्रेसिडेंट ट्रम्प प्रेसिडेंशिअल डिबेटमध्ये म्हणाले,  तुम्ही 47 वर्षांत जे केले नाही त्यापेक्षा अधिक मी 47 महिन्यांत केले आहे. जर या वक्तव्यातून तुम्हाला भारतात कुणाची आठवण येत असेल तर ती तुमची कल्पना आहे."

नेमकं काय म्हणाले होते ट्रम्प - ज्यो बायडन आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या प्रेसिडेंशिअल डिबेटमध्ये ट्रम्प म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोकांचा मृत झाला असता. यावर बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या ओळीत बसवत त्या देशांप्रमाणेच भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला.

ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष -बायडन यांनी कोरोनावरून ट्रम्प यांना घेरताच, ही चीनची चूक असल्याचा कांगावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या या अजब उत्तरानंतर बायडन यांनी ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचा आरोप केला. ट्रम्प हे ईस्टरपर्यंत कोरोना संपेल, असा दावा करत होते. मास्कच्या दाव्यावरही ट्रम्प यांनी जेव्हा मला गरज भासते तेव्हा मी मास्क लावतो, असे उत्तर दिले. मी बायडेन यांच्यासारखे मास्क घालत नाही. जेव्हाही तुम्ही त्यांना पाहाल ते मास्क लावूनच फिरतात. ते 200 मीटर लांबून बोलतील, तेही मास्क लाऊनच, असा आरोपही ट्रम्प यांनी या डिबेटच्या वेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पcongressकाँग्रेसAmericaअमेरिकाBJPभाजपा