शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा- चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:09 IST

चिदंबरम यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेच्या बिकट अवस्थेवरुन मोदी सरकारला वारंवार लक्ष्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या जागी मी असतो आणि माझे निर्णय अशाच प्रकारे चुकले असते, तर मी राजीनामा दिला असता, असंदेखील ते पुढे म्हणाले. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीला चिदंबरम यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.अर्थव्यवस्था वाढीचा वेग, महागाई, औद्योगिक उत्पादन याबद्दलची आकडेवारी देत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्था संकटात असल्याचं म्हटलं. 'खाद्यपदार्थांशी संबंधित महागाई १० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. कारखानदारीच्या वाढीचा वेग ३.८ टक्क्यांवर आला आहे,' असं चिदंबरम म्हणाले. यंदाचं आर्थिक वर्ष संपताना विकास दर वाढीचा वेग ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. जुन्या निकषांच्या आधारे पाहायला गेल्यास हा दर केवळ ३ ते ३.५ टक्के इतका असेल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अर्थचक्राचाच भाग असल्याचा मोदी सरकारचा दावा चिदंबरम यांनी पूर्णपणे खोडून काढला. सध्या निर्माण झालेली परिस्थिती अर्थचक्राचा भाग असल्याच्या दाव्यावर केवळ दोनच व्यक्ती विश्वास ठेवू शकतात. त्यातील एक व्यक्ती म्हणजे अर्थमंत्री आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार, असा टोला त्यांनी लगावला. आर्थिक मंदी रचनात्मक असल्याचं अर्थक्षेत्रातील जाणकारांचं मत असून त्या संदर्भात सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. मोदी सरकारनं केलेल्या दोन गंभीर चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचं त्यांनी सांगितलं. निश्चलीकरण ही अतिशय मोठी चूक होती. वस्तू आणि सेवा कराची सरकारनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं केली. सरकारनं कर आणि तपास यंत्रणांच्या हाती बरेचसे अधिकार दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली, अशा शब्दांत चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था