पान 4- दापट- माशे येथे बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:46+5:302015-07-31T23:54:46+5:30
काणकोण : दापट-माशे येथे दहशत माजविलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर खोतीगाव अभयारण्याच्या अधिकार्यांना यश आले.

पान 4- दापट- माशे येथे बिबट्या जेरबंद
क णकोण : दापट-माशे येथे दहशत माजविलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर खोतीगाव अभयारण्याच्या अधिकार्यांना यश आले.यासंबंधी माशे येथील लॉरेन्स व्हिएगश यांनी वन खात्याच्या अधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे वन खात्याने दि. 23 जुलैला दापट-माशे येथे पिंजरा लावला होता. त्या पिंजर्यात शुक्रवारी (दि. 31) पहाटे बिबट्या जेरबंद झाला, अशी माहिती वनाधिकारी विश्वनाथ पिंगुळकर यांनी दिली. सध्या या बिबट्यास दत्तीपावल येथे आणून ठेवले आहे.