शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 05:57 IST

ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोविड १९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंचे राज्यांसोबत समन्वयाने लेखा परीक्षण करण्यात यावे, अशी शिफारस एका आरोग्यविषयक संसदीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. लेखा परीक्षणामुळे कोविड मृत्यूूंचे योग्य दस्तऐवजीकरण होऊ शकेल, असे या समितीने म्हटले आहे. 

ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविड १९ मृत्यू प्रकरणांची बारकाईने छाननी करून मंत्रालयाने पीडित कुटुंबांना योग्य भरपाई दिली पाहिजे. संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समितीने सोमवारी राज्यसभेत आपला १३७ वा अहवाल सादर केला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवर  प्रचंड दबाव टाकला होता.

दुसऱ्या लाटेत दाव्यांचे पितळ उघडे पडलेरुग्णांच्या कुटुंबियांनी ऑक्सिजनसाठी रांगा लावल्याची अनेक उदाहरणे समोर आली होती.  समितीने आपल्या १२३व्या अहवालात रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत सरकारला सावध केले होते. यावर आरोग्य मंत्रालयाने देश ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत स्वावलंबी असल्याचा दावा केला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत या दाव्यांचे पितळ उघडे पडले. 

काय म्हटले समितीनेसरकारला राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या वितरणाचेही योग्य व्यवस्थापन करता आले नाही.ऑक्सिजनची वेगाने वाढलेली मागणी व पुरवठा यात सरकारला समतोल राखता आला नाही. ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या खाटांची उपलब्धता यांच्या सुुमार देखरेखीमुळे परिस्थिती गंभीर बनली.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार