शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Corona Third Wave: ऑक्सिजन प्लांट, ICU बेड, 50 लाख रेमडिसिविर..., कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मोठी तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:52 IST

Corona Third Wave: रेमडिसिविरच्या ५० लाख वायल सुरक्षित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्या त्वरित राज्यांमध्ये पाठवल्या जाऊ शकतील.

नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट (Covid-19 Third Wave) येणार असल्याची शक्यता असल्यामुळे आता देशभरात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) रेमडिसिविर इंजेक्शनच्या ५० लाख वायल सुरक्षित केल्या आहेत. याशिवाय सरकार टोसिलजुमाबच्या प्रोडक्सनची सुद्धा तयारी करत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज१८ ला दिली आहे.

परिस्थिती ठिक होण्यासाठी आणि पुरेसा साठा झाल्यावर नोव्हेंबरपासून कोरोना लसीची पुन्हा निर्यात करण्याचा विचार सुद्धा सरकार करत आहे. परंतु सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष देशातच लसीकरणावर आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिसिविर आणि टोसिलजुमाब ही महत्त्वाची औषधे होती. सरकारने या औषधांच्या उत्पादनात वाढ करेपर्यंत त्यांची कमतरता होती. देशातरेमडिसिविरचे उत्पादन वाढविण्यात आले आणि स्विस कंपनी हॉफमॅनला रोसे यांनी त्यांनी पेटेंट केल्यामुळे टोसिलजुमाब बाहेरून मागविण्यात आले. टोसिलजुमाबचे उत्पादन आता भारतात तयार केले जात असल्याचे केंद्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, रेमडिसिविरच्या ५० लाख वायल सुरक्षित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्या त्वरित राज्यांमध्ये पाठवल्या जाऊ शकतील. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या त्याचे सात परवानाधारक उत्पादक आहेत, ज्याची क्षमता दरमहा सव्वा कोटी वायल बनवण्याची आहे. आता या उत्पादकांनी तीन कोटी वायल तयार केल्या आहेत. लवकरच रेमडिसिविर निर्यातीची तयारी केली जात आहे.

व्हॅक्सिन निर्यात?लसीच्या निर्यातीचा प्रश्न आहे, तर नोव्हेंबरपासून सरकार निर्यात करण्यास सुरुवात करू शकते. तोपर्यंत देशात ६ स्वदेशी लस उत्पादक असू शकतात. त्यावेळी पुरेसा साठा असेल, असे मानले जाते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारखे मोठे उत्पादक सरकारला निर्यात उघडण्यास सांगत आहेत. परंतु सध्या सरकारचे संपूर्ण लक्ष देशात लसीकरणावर आहे. भारताने जानेवारीमध्ये लस मैत्री अंतर्गत लस निर्यात करण्यास सुरुवात केली. यावरून सरकारला विरोधकांच्या जोरदार आरोपांचा सामना करावा लागला आहे. ते बंद करेपर्यंत ६.६३ कोटी लसीनिर्यात करण्यात आल्या.

अन्य तयारी...तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्राने इतर फ्रंटवरही तयारी केली आहे. सरकारने मंजूर केलेल्या एकूण १५७३ ऑक्सिजन प्रकल्पांपैकी २९३ प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारच्या विविध मंत्रालयांकडून३५१ प्रकल्पही बसविण्यात येत आहेत. देशात सध्या एकूण १२४४ ऑक्सिजन टँकर आहेत. एप्रिलपासून २ लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत. देशात १८ लाखाहून अधिक आयसोलेशन बेड आणि १.२५ लाख आयसीयू बेड आहेत. याशिवाय ५०,००० व्हेंटिलेटर्सही राज्यांना पुरवण्यात आले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या