दुष्काळावर खरेदीने केली मात

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:30+5:302015-07-15T23:12:30+5:30

लातूर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील गंजगोलाई परिसरातील कापड गल्लीत नवीन कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे़ पाऊस नसल्याने बाजारपेठेतील आकर्षक खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने कपडा बाजारांत किमान १० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़

Overcoming Done Disease | दुष्काळावर खरेदीने केली मात

दुष्काळावर खरेदीने केली मात

तूर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील गंजगोलाई परिसरातील कापड गल्लीत नवीन कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे़ पाऊस नसल्याने बाजारपेठेतील आकर्षक खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने कपडा बाजारांत किमान १० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे़
रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधव कुटुंबातील अबालवृध्दांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत़ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे काही प्रमाणात बाजारपेठेवर परिणाम झाला असला तरी आणखीन दोन दिवस सणाला अवधी आहे़ त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आणखीन उत्साह दिसून येणार आहे़ चिमुकली मुले आपल्या कुटुंबासोबत रेडिमेड कपडे खरेदीसाठी बाजारात असल्याचे दिसून येत आहे़ मनाप्रमाणे ड्रेस खरेदी करताना चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत आहे़ बाजारपेठेत वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे उपलब्ध आहेत़ बीरजीस, थ्रीपीस, मोदी ड्रेस,जिन्स पॅन्ट व टीर्शट अशी आकर्षक कपडे असली तरी मोदी ड्रेसची बच्चे कंपनीवर भूरळ पडल्याचे खरेदीवरुन पहावयास मिळत आहे़ अशा ड्रेसच्या किंमती ७०० रुपयांपासून ते २ हजार रूपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ नेहरु, पायजमा व जॅकेट अशी या ड्रेसची रचना आहे़
मुलींचा ओढा जोया,अनारकली, मसकलीकडे़़़
बदलत्या काळानुसार कपडे खरेदीत मुलींच्या आवडी- निवडी बदल्याचे दिसून येत आहे़ दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत प्रसिध्द असलेल्या जोया ड्रेस, मसकली ड्रेस, अनारकली या कपड्यांना विशेष पसंती असल्याचे पहावयास मिळत आहे़
रेडिमेडची के्रझ़़़़
तरुणांची कपडे खरेदी करण्याची क्रेझ बदलली आहे़ शिवून कपडे घेण्यापेक्षा रेडिमेड कपडे खरेदीवर भर असल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Overcoming Done Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.