एकंदरित निकालाची पोलिसांना उत्सुकता व्हॉट्स ॲपसह दूरसंचावर ऐकले निकाल

By Admin | Updated: May 17, 2014 00:34 IST2014-05-17T00:01:44+5:302014-05-17T00:34:32+5:30

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील मतदारसंघांचा निकाल काय लागतो, याकडे पोलिसांचेही लक्ष सकाळपासून लागले होते. बंदोबस्तामध्ये असतानाही पोलिसांनी व्हॉट्स ॲपसह जिथे दूरदर्शन संच असेल, त्याठिकाणी जाऊन निकालाचे एकंदरित चित्र जाणून घेतले. बंदोबस्तातील पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये देशभरातील निकालांचीच चर्चा रंगली होती.

The overall outcome of the police's response to the excitement with the Whoots episode | एकंदरित निकालाची पोलिसांना उत्सुकता व्हॉट्स ॲपसह दूरसंचावर ऐकले निकाल

एकंदरित निकालाची पोलिसांना उत्सुकता व्हॉट्स ॲपसह दूरसंचावर ऐकले निकाल

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील मतदारसंघांचा निकाल काय लागतो, याकडे पोलिसांचेही लक्ष सकाळपासून लागले होते. बंदोबस्तामध्ये असतानाही पोलिसांनी व्हॉट्स ॲपसह जिथे दूरदर्शन संच असेल, त्याठिकाणी जाऊन निकालाचे एकंदरित चित्र जाणून घेतले. बंदोबस्तातील पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये देशभरातील निकालांचीच चर्चा रंगली होती.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खदान परिसरातील सरकारी गोडावून, जेल चौक, सिंधी कॅम्प परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मतमोजणीचे ठिकाणी व सिंधी कॅम्प परिसरामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच, सर्व ठाण्यांचे ठाणेदार तळ ठोकून होते; परंतु याठिकाणी अधिकार्‍यांमध्ये चर्चा होती, ती देशभरातील मतदारसंघांच्या निकालांची आणि दिग्गज उमेदवारांच्या जय-पराजयाची. या अधिकार्‍यांसोबतच, पोलिस कर्मचारीसुद्धा चर्चा करण्यामध्ये मागे नव्हते. सर्वांमध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे, नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार की नाही. 


ये तो होना ही था...
पोलिस ठाण्यांमधील दूरदर्शन संचासमोरसुद्धा निकालाची स्थिती जाणून घेण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी एकच गर्दी केली होती. एवढेच काय, रस्त्यांवरील वाहनचालक, नागरिक ठाण्यांमध्ये येऊन निकालाची स्थिती पाहत होते. देशातील निकालांची येत असलेली स्थिती पाहून, पोलिस कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. ये तो होना ही था... अशी प्रतिक्रिया पोलिसांच्या तोंडून ऐकायला मिळत होती.  नातेवाईक, मित्रांना माहिती देण्यासाठी, पोलिस कर्मचारीही हातात पेन, कागद घेऊन उमेदवारांच्या मतांची संख्या लिहून घेताना दिसत होते.


छाया: १७ सीटीसीएल: ४३, ४४ व ४८(व्हॉट्स ॲपवर निकाल जाणून घेताना पोलिस, दुकानामध्ये दूरदर्शन संचावरील निकाल पाहताना पोलिस, नातेवाईकांना फोनवरून निकालाची माहिती देताना पोलिस कर्मचारी.)

Web Title: The overall outcome of the police's response to the excitement with the Whoots episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.