शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आसाममधील पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ मृत्यूमुखी; पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 17:06 IST

पंतप्रधान मोदींचा आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याशी संवाद; सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. आसाममधील पुराचा फटका ३० जिल्ह्यांमधल्या ५४ लाख नागरिकांन बसला असून यामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधला असून राज्यातल्या परिस्थितीची माहिती त्यांच्याकडून घेतली आहे. राज्याला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन मोदींकडून देण्यात आलं आहे.पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुरामुळे आसामचं मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला असून भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या २६ इतकी आहे. त्यामुळे या वर्षी आलेल्या पुरात आणि त्यामुळे झालेल्या भूस्खलनात मृत पावलेल्यांचा आकडा १०७ वर जाऊन पोहोचला आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना आतापर्यंत राज्य सरकारकडून ९९ हजार १७६ क्विंटल तांदूळ, १९ हजार ३९७ क्विंटल डाळ आणि १ लाख ७३ हजार लीटर मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे.सर्व मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. १६७ पूल, १६०० पेक्षा अधिक रस्त्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.

टॅग्स :Assam Floodआसाम पूरNarendra Modiनरेंद्र मोदी